Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » मुख्यमंत्री शिंदे देणार राजीनामा तर सत्तेचा फॉर्म्युला ठरणार
    राजकारण

    मुख्यमंत्री शिंदे देणार राजीनामा तर सत्तेचा फॉर्म्युला ठरणार

    editor deskBy editor deskNovember 26, 2024No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    मुंबई : वृत्तसंस्था

    राज्यात विधानसभा निवडणुकीचे निकाल लागले आहे. यंदा महायुतीला जनतेने एकहाती सत्ता दिली असून आता मंगळवारी, २६ नोव्हेंबर रोजी राज्य विधानसभेची मुदत संपते. त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना आपल्या पदाचा आणि ओघानेच सरकारचा राजीनामा राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांना सादर करावा लागेल. त्याचवेळी नव्या सरकारचा शपथविधी होईपर्यंत राज्यपाल शिंदे यांना काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून राज्य कारभार पाहण्यास सांगू शकतात. राजभवनावरील ही औपचारिकता मंगळवारी सकाळी पूर्ण झाल्यानंतर तिन्ही पक्षांची संयुक्त बैठक होऊ शकते.

    केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, संरक्षणमंत्री राजनाथ सिंह मंगळवारी मुंबईत येत असून, तिन्ही पक्षांच्या बैठकीनंतर सायंकाळपर्यंत नव्या मुख्यमंत्र्यांचे नाव निश्चित होऊ शकते. अमित शहा, राजनाथ सिंह यांच्या उपस्थितीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांची संयुक्त बैठक होणार आहे. दरम्यान, मुख्यमंत्रिपदासाठी शिवसेनेचे प्रमुख नेते एकनाथ शिंदे हटून बसले असून, प्रदेश भारतीय जनता पक्षही आपला दावा मागे घेण्यास तयार नाही. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सोमवारी संध्याकाळी दिल्लीत दाखल झाले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाची आतापर्यंत फोनवरच चर्चा सुरू असून, आता मंगळवारी मुंबईतच अंतिम निर्णय अपेक्षित आहे.

    अमित शहा मुंबईत येत असल्याने शिंदे यांनी आपल्या सर्व भेटी व कार्यक्रम रद्द केले आहेत. एवढेच नव्हे, तर त्यांनी दिल्लीला जाणेही टाळले. दरम्यान, लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांनी आयोजित केलेल्या स्वागत समारंभाला उपस्थित राहून उपमुख्यमंत्री फडणवीस अमित शहा यांच्याशी चर्चा न करताच मुंबईला परतले असल्याचे सोमवारी रात्री सांगण्यात आले. पूर्वनियोजित कार्यक्रमानुसार फडणवीस रात्री उशिरा अमित शहा यांच्याशी चर्चा करणार होते. मात्र, अचानक त्यात बदल झाला. स्वतः अमित शहा यांनी मुंबईला येण्याचा निर्णय घेतला.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    सरपंच परिषदेच्या लढ्याला यश; ६ महिन्यांची प्रशासक म्हणून मुदतवाढ जाहीर

    February 21, 2026

    राजकीय वाद न्यायालयात; राहुल गांधींना पुन्हा जामीन

    February 21, 2026

    “मोठ्या लोकांचा पाठिंबा असल्यानेच धाडस?” : रोहित पवारांचा सवाल

    February 21, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.