Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » जरांगे पाटलांचे मोठे वक्तव्य : ज्याला पाडायचे आहे त्याला पाडले पण…
    राजकारण

    जरांगे पाटलांचे मोठे वक्तव्य : ज्याला पाडायचे आहे त्याला पाडले पण…

    editor deskBy editor deskNovember 25, 2024No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    मुंबई : वृत्तसंस्था

    राज्यात विधानसभा निवडणुकीचे निकाल लागले असून यात महायुतीला मोठे यश मिळाले आहे. तर महाविकासाआघाडीचा दारुण पराभव झाला. विधानसभेच्या निकालानंतर आता पुन्हा एकदा मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी एक मोठी घोषणा केली आहे. मराठ्यांसाठी आता राजकारण हा विषय संपला आहे. मराठे आता पुन्हा एकदा कडवी झुंज देणार आहेत. आम्ही देशात कधीही झाले नाही, असे भव्य आणि मोठे सामूहिक उपोषण करणार आहोत, असे विधान मनोज जरांगे पाटील यांनी केले.

    मनोज जरांगे पाटील यांनी नुकतंच प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांना महायुतीच्या मुख्यमंत्रिपदावरुन प्रश्न विचारण्यात आला. त्यावर त्यांनी थेट भाष्य केले. “सत्ता, सत्ता असते, त्यावेळी मराठी नेत्यांना गुडघ्यावर टेकवले होते आणि आताही तेच सत्तेत आहेत, त्याचे आम्हाला काही वाटत नाही. मराठ्यांनी त्यांना पाच वर्षे हाताळलं आहे, त्यामुळे आता हाताळणे काही अवघड नाही. त्यामुळे कोणीही मुख्यमंत्री झाले काय..? नाही झाले काय.? आम्हाला त्याबद्दल कोणतेही सोयर सुतक नाही”, असे मनोज जरांगे पाटील म्हणाले.
    “आम्ही मात्र आरक्षणासाठी प्रचंड मोठा लढा करणार आहोत. देशात कधीही झाले नसेल असे भव्य आणि मोठे सामूहिक आमरण उपोषण करणार आहोत. मराठे पुन्हा एकदा कडवी झुंज देणार आहेत, आता राजकारण विषय संपला आहे. ज्याला निवडून आणायचे त्याला आणले आहे आणि ज्याला पाडायचे आहे त्याला पाडले पण आहे. मराठ्यांना जे सांगितले होते ते त्यांनी केले आहे, आता त्यांच्या लेकरांचा प्रश्न आहे”, असे मनोज जरांगे पाटील यांनी म्हटले.

    “मराठे आता सामूहिक उपोषणाच्या तयारीला लागले आहेत आणि ते जिंकणार आहेत. निवडून येणाऱ्यांनी आनंदात हुरळून जायचे नसते आणि पडणाऱ्यांनी जास्त खचायचे नसते. निवडून आलेले आणि पडणारे दोघांनीही मराठा समाजासाठी सक्रिय झाले पाहिजे. निवडून आलेले आणि पडलेले या दोघांचीही जबाबदारी आहे. लोकांमध्ये राहले नाही तर पुढच्या पाच वर्षांत या दोघांनाही लोक टिपऱ्याने हाणतील. मराठ्यांनी पडलेले आणि निवडून आलेल्या दोघांनाही मतदान केलेले आहे. त्यांनी मराठ्यांच्या प्रश्नासाठी लगेच बाहेर पडले पाहिजे आणि बाहेर पडले नाहीतर लोक तुम्हाला चपलेने हाणतील”, असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिला.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    कष्टकरी कुटुंबातून मुंबई कोर्टापर्यंत; भगवान नन्नवरे यांची प्रेरणादायी वाटचाल

    August 11, 2026

    शालार्थ घोटाळ्याचा जळगाव कनेक्शन धक्कादायक! ६६ संस्था, ८४९ जण संशयाच्या भोवऱ्यात

    August 11, 2026

    राष्ट्रीय महामार्गांच्या हद्दीत नवीन ढाबे, हॉटेलला ब्रेक; अनधिकृत बांधकामे ६० दिवसांत हटवण्याचे आदेश

    August 11, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.