Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » सर्व समस्यांवर मात करण्यासाठी महाविकास आघाडी विकासाची पंचसूत्री
    राज्य

    सर्व समस्यांवर मात करण्यासाठी महाविकास आघाडी विकासाची पंचसूत्री

    editor deskBy editor deskNovember 13, 2024No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    रावेर (प्रतिनिधी) : विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुकीत भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, आणि महाविकास आघाडीच्या अधिकृत उमेदवार धनंजय शिरीष चौधरी यांच्या प्रचारार्थ आज (दि.१२) फैजपूर येथे राज्यसभा खासदार व सुप्रसिध्द कवी इमरान प्रतापगढी यांच्या उपस्थितीत जाहीर सभा संपन्न झाली. या सभेला आ.शिरीषदादा चौधरी, माजी आमदार रमेशदादा चौधरी, अब्दुल करीम सालार, प्रदेश उपाध्यक्षा प्रतिभाताई शिंदे काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष प्रदीप पवार मुक्ती हारून साहेब व महाविकास आघाडीचे पदाधिकारी उपस्थित होते.

    या वेळी मार्गदर्शन करताना खासदार इम्रान प्रतापगढी म्हणाले की, गेल्या अडीच वर्षांत राज्यात महायुतीचे सरकार असूनही त्यांनी जनतेच्या हितासाठी सत्ता वापरली नाही. यामुळे शेतकरी व कष्टकऱ्यांच्या समस्यांमध्ये वाढ झाली, महिलांवरील अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ झाली, बेरोजगारी वाढली. या सर्व समस्यांवर मात करण्यासाठी महाविकास आघाडी विकासाची पंचसूत्री योजना राबवणार आहे.

    महालक्ष्मी योजनेअंतर्गत स्त्रियांना दरमहा तीन हजार रुपये आणि मोफत बस प्रवास, कृषी समृद्धीसाठी तीन लाखांपर्यंत कर्जमाफी, नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना पन्नास हजारांचे अनुदान, हमीभावाचे आश्वासन, बेरोजगार तरुणांसाठी चार हजार रुपये भत्ता, पंचवीस लाखांचा आरोग्य विमा, जातीनिहाय जनगणना आणि ५०% आरक्षण मर्यादा वाढवण्यासाठी केंद्राकडे पाठपुरावा अशा उपाययोजना राबवणार असल्याचे सांगितले. महाविकास आघाडीच्या सर्व उमेदवारांना मतदानातून विजयी करण्याचे आवाहनही त्यांनी केले. या जाहीर सभेला परिसरातील नागरिक, तरुण – तरुणी तसेच महाविकास आघाडीच्या पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    जिल्हा बँकेच्या नव्या नेतृत्वासमोर जुन्या प्रश्नांचा डोंगर ; नोकरभरतीतील कथित आर्थिक फसवणूक, ५९ टक्क्यांचा आर्थिक पेच

    November 14, 2026

    छठ पूजेच्या आडून महाराष्ट्रात संघर्ष घडवण्याचा भाजपचा डाव : राज ठाकरेंचा गंभीर आरोप!

    November 13, 2026

    अजित पवारांच्या घातपाताच्या संशयावरून राजकीय वाद पेटला : गृहराज्यमंत्री कदमांच्या राजीनाम्याची आ.अनिल पाटलांची मागणी 

    November 12, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.