Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » धरणगाव वनविभागाच्या राजवड परिमंडळातील क्षेत्राला आग; झाडे व रोपे आगीत जळून खाक
    धरणगाव

    धरणगाव वनविभागाच्या राजवड परिमंडळातील क्षेत्राला आग; झाडे व रोपे आगीत जळून खाक

    टीम लाईव्ह महाराष्ट्रBy टीम लाईव्ह महाराष्ट्रFebruary 8, 2022Updated:February 8, 2022No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    दोषींवर कारवाईची मागणी : वृक्षमित्र राजेंद्र वाघ

    धरणगाव प्रतिनिधी । शहरापासून वनविभागाच्या राजवड परिमंडळ अंतर्गत गट क्रमांक १२८० क्षेत्रा मंगळवारी ७ फेब्रुवारी रोजी दुपारी दीड वाजता लागलेल्या आगीत मिश्ररोपण आगीत जळुन खाक झाली. आग इतकी भयानक होती की आगीच्या क्षेत्राला लागून असलेल्या शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत पोहचली.

    याबाबत सविस्तर माहिती अशी की, सन २०२१-२२ ह्या वर्षी जळगाव वनविभाग धरणगाव अंतर्गत, वनक्षेत्र एरंडोल च्या नियतक्षेत्र राजवड गट क्र १२८० येथे राज्य योजना अंतर्गत वनीकरण भरगच्च कार्यक्रम राबविण्यात येऊन मिश्र रोपवन पावसाळ्यात १५.०१ हेक्टर जागेमध्ये लावण्यात आले दोन रोपांचे अंतर ३×३ मी एवढे होते. या रोपवणात एकूण ९२३७ खड्ड्यात अनेक प्रजातीचे रोपे लावण्यात आले होते. परंतु आज दि. ८ फेब्रुवारी २०२२ ला दुपारी दीड वाजता लागलेल्या आगीमध्ये वाऱ्याच्या झुळकी संपुर्ण रोपवन आगीच्या कवेत आले आणि संपुर्ण रोपवन आगीत जाळून खाक झाले तसेच या रोपवणात असलेले विविध प्रकारची अनेक झाडे आणि वनस्पती सुध्दा जळुन नष्ट झाली आहे. सदरील आग कशी लागली याची सविस्तर माहिती वनपाल अनिल साळुंखे यांना विचारणा केली असता आगीचे कारण समजले नाही असे सांगितले. दरम्यान वनक्षेत्राच्या परिसराला आग लागल्याने वनविभागाचे वनपाल अनिल साळुंखे, वनरक्षक एन एन क्षीरसागर, कर्मचारी शांताराम पाटील, सागर झुंझारराव व गावातील राजेंद्र वाघ, पवन माळी, समाधान माळी, देविदास महाजन, बापू बडगुजर, भूषण महाजन, राहुल माळी नपा चे टँकर चालक निलेश महाजन आदींनी आग विजवण्याचा प्रयत्न केला. पण आग आटोक्यात लवकर आटोक्यात येत नव्हती. या आगीत लाखो रुपयांचा शासनाचा नुकसान झाला असून संपुर्ण रोपवन जळुन खाक झाले आहे.

    शासन झाडे लावा झाडे जगवा यासाठी करोडो रुपये खर्च करीत असते, जंगलाचा होणारा ऱ्हास थांबवण्यासाठी व पर्यावरण चा समतोल साधण्यासाठी झाडे लावा – झाडे जगवा, शासन वृक्ष लावण्यावर अनेक योजना राबवित असते व करोडो रुपयाचा खर्च करीत असते परंतु वनविभागाच्या निष्काळजीपणा मुळे संपुर्ण रोपवन उध्वस्त होऊन लाखो रुपयांचा चुराडा झाला आहे. या लागलेल्या आगीत कोण दोषी आहे याची वन विभागाने चौकशी करून सबंधितावर कारवाई करावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र वाघ व परिसरातील गावकऱ्यांनी केली आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    टीम लाईव्ह महाराष्ट्र
    • Website

    Related Posts

    पाळधीत एका रात्रीत दोन घरफोड्या; दागिने-रोख रक्कम लंपास !

    March 12, 2026

    कुटुंब लग्नासाठी बाहेर, चोरट्यांनी साधला डाव; धरणगावात मोठी घरफोडी

    March 9, 2026

    सोनवद येथे ‘छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिर’ संपन्न; विविध योजनांचे प्रत्यक्ष वाटप

    March 7, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.