Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » बहिणींनी साकारले रांगोळीतून ‘अब की बार, राजूमामाच आमदार’
    राज्य

    बहिणींनी साकारले रांगोळीतून ‘अब की बार, राजूमामाच आमदार’

    editor deskBy editor deskNovember 7, 2024No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव : प्रतिनिधी

    येथील जळगाव शहर मतदारसंघाचे भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस व मित्र पक्षाचे महायुतीचे उमेदवार आ. राजूमामा भोळे यांनी गुरुवारी सकाळी पिंप्राळ्यातील काही भागात प्रचार केला. बारीवाडा परिसरातील “अब की बार, राजू मामाच आमदार” या शीर्षकाखाली काढलेल्या रांगोळीतून एका भगिनीने दिलेल्या प्रेमळ शुभेच्छा पाहून आ. राजूमामा भोळे भारावून गेले. तर प्रचारामध्ये ‘प्रति मकरंद अनासपुरे’ खान्देशी कलावंत बाळू इंगळे यांनी प्रचारात सहभाग घेऊन मतदारांना आ. राजूमामा भोळे यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याचे आवाहन केले.

    पिंप्राळा भागातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात महाराजांच्या पुतळ्याला वंदन करून व पुष्पहार अर्पण करीत आ. राजूमामा भोळे यांनी प्रचाराला सुरुवात केली. गर्जना चौक, बारीवाडा परिसर, कोळीवाडा परिसर, संत मीराबाई नगर, गणपती नगर, प्रल्हाद नगर, आनंद मंगल सोसायटी, इंद्रदेव नगर, निसर्ग कॉलनी परिसर, साई मंदिर परिसर, नामदेव नगर परिसरातून हुडको परिसरात रॅलीचा समारोप झाला. रॅलीमध्ये मकरंद अनासपुरे यांची प्रतिमा असलेले खान्देशी कलावंत बाळू इंगळे यांनी सहभागी होत जनतेकडे आ. राजूमामा भोळे यांच्यासाठी आशीर्वाद मागितले.

    बारीवाडा परिसरामध्ये माधुरी हितेश बारी या भगिनीने “अब की बार, राजू मामाच आमदार” या शीर्षकाखाली काढलेली आकर्षक रांगोळी लक्ष वेधून घेत होती. अनेक महिला भगिनींनी आ. भोळे यांचे औक्षण करून त्यांना विजयासाठी सदिच्छा दिल्या. संत मीराबाई नगर येथे राधाकृष्ण मंदिर, हनुमान मंदिर आणि महादेव मंदिरात दर्शन घेऊन विजयासाठी आ. भोळे यांनी साकडे घातले. तसेच माजी नगरसेवक शोभाताई बारी यांच्या घरी भेट देऊन शुभाशीर्वाद घेतले.

    प्रचार रॅलीमध्ये भाजपाचे लोकसभा क्षेत्र प्रमुख डॉ. राधेश्याम चौधरी, महानगर जिल्हाध्यक्ष उज्वलाताई बेंडाळे, माजी नगरसेवक शोभाताई बारी, सुरेश सोनवणे, मंडळ क्रमांक ५ चे अध्यक्ष शक्ति महाजन, विजय पाटील, अतुल बारी, शुभांगी बि-हाडे, नीतू परदेशी, चंद्रकांत कोळी, उमेश सूर्यवंशी, योगेश गोसावी, महेंद्र केळकर, किरण भोई, डॉ. जयश्री बारी, माजी नगरसेवक सदाशिवराव ढेकळे, कैलास सोनवणे, शिवसेना पक्षाचे माजी नगरसेवक ज्योती चव्हाण, कुंदन काळे, उमेश सोनवणे, आशुतोष पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटाचे जिल्हा नियोजन समिती सदस्य योगेश देसले, विनोद देशमुख, सुनिता शिंदे, योगेश पाटील, लता मोरे, पी.एस. पाटील, साजिद पठाण, रिपाई (आठवले) गटाचे पदाधिकारी मिलिंद अडकमोल, मिलिंद सोनवणे, अविनाश पारधे, लोक जनशक्ती पार्टीचे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष दीपक सपकाळे, जिल्हाध्यक्ष अशोक पारधे यांच्यासह महायुतीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    सरपंच परिषदेच्या लढ्याला यश; ६ महिन्यांची प्रशासक म्हणून मुदतवाढ जाहीर

    February 21, 2026

    राजकीय वाद न्यायालयात; राहुल गांधींना पुन्हा जामीन

    February 21, 2026

    “मोठ्या लोकांचा पाठिंबा असल्यानेच धाडस?” : रोहित पवारांचा सवाल

    February 21, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.