Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » धक्कादायक : कंडारी येथे उधारीच्या ५० रूपयांसाठी एकाने गमावला जीव !
    क्राईम

    धक्कादायक : कंडारी येथे उधारीच्या ५० रूपयांसाठी एकाने गमावला जीव !

    टीम लाईव्ह महाराष्ट्रBy टीम लाईव्ह महाराष्ट्रFebruary 8, 2022Updated:February 8, 2022No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    लाईव्ह महाराष्ट्र न्यूज | पन्नास रूपयाचा उधारीसाठी काका पुतण्यांमध्ये झालेल्या हाणामारीत काका गटारीत पडल्याने उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याप्रकरणी धरणगाव पोलीसात गुन्हा नोंदविण्याचे काम सुरू होते.

    यासंदर्भात अधिक असे की, धरणगाव तालुक्यातील कंडारी येथे राजू मानसिंग भिल (वय २८) आणि भारत सुकडू भिल (वय ४४) या दोघांमध्ये ५० रुपयांच्या उधारीवरून सोमवारी ७ फेब्रुवारी रोजी रोजी रात्री आठ साडेआठ वाजेच्या सुमारास शाब्दिक चकमक सुरू झाली. थोड्याच वेळात शाब्दिक चकमकीचे रूपांतर हाणामारीत झाले. या हाणामारीत राजुने आपले काका भारत यांना जोराचा धक्का दिला. या धक्क्यात भारत हे जवळच्या गटारीत जाऊन पडले. गटारीत पडल्यामुळे त्यांच्या डोक्याला जबर मार बसून मोठा रक्तस्त्राव झाला. यानंतर भेदरलेल्या पुतण्या राजूने त्यांना लागलीच नातेवाईकांच्या मदतीने रूग्णालयात दाखल केले. परंतु वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणीअंती भारत भिल यांना मृत घोषित केले. यासंदर्भात पुतण्या राजू भिल याच्या विरोधात सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक अमोल गुंजाळ हे करीत आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    टीम लाईव्ह महाराष्ट्र
    • Website

    Related Posts

    कन्नड घाटात एसटी बसचा थरार! स्टेअरिंग रॉड तुटला; ५९ प्रवाशांचा जीव थोडक्यात बचावला

    August 23, 2026

    २३ वर्षीय तरुणाने विषारी औषध प्राशन करून संपविले आयुष्य !

    August 23, 2026

    २० फूट उंचीवरून पडलेल्या तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू!

    August 23, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.