Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » पाळधी येथे भरधाव कारच्या धडकेत तरूणाचा दुदैवी मृत्यू
    क्राईम

    पाळधी येथे भरधाव कारच्या धडकेत तरूणाचा दुदैवी मृत्यू

    टीम लाईव्ह महाराष्ट्रBy टीम लाईव्ह महाराष्ट्रFebruary 7, 2022No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव प्रतिनिधी । पाळधी येथे जेवणासाठी गेलेल्या द्वारका नगरातील तरूणाचा भरधाव कारने धडक दिल्याने मृत्यू झाल्याची दुदैवी घडली. याबाबत पाळधी दुरक्षेत्र पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    गणेश सुखदेव महाजन (वय-३०) रा. द्वारका नगर, जळगाव असे मयत झालेल्या तरूणाचे नाव आहे.
    गणेश महाजन हा आपल्या आईवडील, पत्नी व दोन मुलांसह द्वारका नगर येथे वास्तव्याला आहे. गणेश महाजन हा महावितरण कंपनीत नोकरीला होता. द्वारका नगर परिसरात गणेशच्या मावस भावाचे लग्न असल्याने रविवारी ६ फेब्रुवारी रोजी सायंकाळी हळदीचा कार्यक्रम होतो. जेवण करून कुटुंबासह सर्वजण आनंदाने नाचले. नाचण्याचा कार्यक्रम आटोपल्यानंतर रात्री १०.३० वाजेच्या सुमारास गणेश नातेवाईकांसह मोठा भाऊ, पाहणे आणि मित्र परिवार यांच्यासोबत पाळधी येथे हॉटेलात जेवणासाठी गेले.

    पाळधी येथील हॉटेलमध्ये जेवण आटोपल्यानंतर गणेश हा त्याच्या मित्रासह आगोदर द्वारकानगर कडे रवाना झाले. हॉटेलपासून पुढे गेल्यानंतर काही अंतरावर मागून भरधाव कारने जोरदार धडक दिल्याने गणेशचा जागीच मृत्यू झाला तर त्याचा सोबत असलेला मित्र जखमी झाला. कारचालक कार सोडून पसार झाला होता. वैद्यकीय अधिकारी यांनी मयत घोषीत केले. गणेशच्‍या अचानक जाण्याने महाजन परिवारावर दुःखाचा डोंगर पसरला आहे. गणेशच्‍या पश्‍चात आई– वडील, पत्‍नी, एक मुलगा, एक मुलगी, मोठा भाऊ वहिनी असा परिवार आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    टीम लाईव्ह महाराष्ट्र
    • Website

    Related Posts

    सर्वांसमोर झालेला अपमान जीवावर बेतला; २० वर्षीय विद्यार्थ्याच्या मृत्यूने जळगाव हळहळले

    February 17, 2026

    शेतात पाणी भरण्यास निघालेल्या तरुणाचा भीषण अपघातात मृत्यू

    February 16, 2026

    दारूच्या नशेत वाद, तरुणाचा निर्घृण खून; अल्पवयीनसह दोघे ताब्यात

    February 16, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.