Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » मंत्री अब्दुल सत्तारांच टेन्शन वाढलं : उमेदवारी राहणार की रद्द होणार?
    राजकारण

    मंत्री अब्दुल सत्तारांच टेन्शन वाढलं : उमेदवारी राहणार की रद्द होणार?

    editor deskBy editor deskNovember 3, 2024No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    छत्रपती संभाजी नगर : वृत्तसंस्था

    राज्यात विधानसभा निवडणुकीमधून माघार घेण्याची वेळ तोंडावर येवून ठेपली असतांना आता राज्याचे मंत्री आणि शिंदे गटाचे नेते अब्दुल सत्तार यांना मोठा झटका लागला आहे. निवडणूक आयोगाने थेट सत्तार यांच्या शपथपत्रांची तातडीची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे सत्तार यांचं टेन्शन वाढलं आहे. सत्तार यांची उमेदवारी राहणार की रद्द होणार? अशी चर्चा या निमित्ताने सुरू झाली आहे. निवडणूक आयोगाच्या चौकशीत सत्तार दोषी आढळल्यास सिल्लोडच्या राजकारणात मोठी उलथापालथ होण्याची शक्यताही वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे निवडणूक आयोगाच्या निर्णयाकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

    जिल्हा निवडणूक आयोगाने अब्दुल सत्तार यांच्या शपथपत्राची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. तातडीने चौकशी करून अहवाल सादर करण्याचे आदेश निवडणूक आयोगाने दिले आहेत. त्यामुळे सत्तार यांची डोकेदुखी वाढली आहे. अब्दुल सत्तार यांच्या शपथपत्रात 16 चुकी असल्याचा आरोप करण्यात आला होता. याप्रकरणी सामाजिक कार्यकर्ते महेश शंकरपेल्ली आणि डॉ. अभिषेक हरिदास यांनी निवडणूक आयोगाकडे तक्रार केली होती. त्यावर जिल्हा निवडणूक आयोगाने हे आदेश दिले आहेत.
    अब्दुल सत्तार यांनी त्यांच्या निवडणूक शपथपत्रात मालमत्तेची लपवालपवी केली आहे. प्रत्यक्षातील मालमत्ता आणि शपथपत्रात दाखवण्यात आलेली मालमत्ता याच्या तपशीलात तफावत असल्याचं तक्रारीत म्हटलं आहे. तसेच या मालमत्तेवर जे बांधकाम करण्यात आलं आहे, त्याचीही योग्य माहिती देण्यात आली नसल्याचं सांगण्यात आलं आहे. सत्तार यांनी चारचाकी वाहन असल्याचं शपथपत्रात नमूद केलं आहे. पण हे वाहन कधी खरेदी केलं त्याची तारीखच दिली नाही. याशिवाय सत्तार यांची जालन्यात मालमत्ता आहे, त्याचा तपशीलही दडवण्यात आल्याचा आरोप या शपथपत्रात करण्यात आला आहे.

    सत्तार यांनी आपल्या मालमत्तेत ज्वेलरी, वाहने, मालमत्ता याच्यासह विविध सहकारी संस्थांमधील शेअर्सची माहितीही चुकीची देण्यात आली आहे. सत्तार यांनी शपथपत्रात अनेक माहिती दिलेली नाही, दिलेली माहिती एक तर चुकीची आहे आणि अर्धवट आहे. त्यामुळे सत्तार यांची उमेदवारी रद्द करण्यात यावी, अशी मागणी या तक्रारीत करण्यात आली होती. त्याची निवडणूक आयोगाने गंभरी दखल घेतली असून या संपूर्ण प्रकरणाची तातडीने चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. अर्ज वैध ठरवण्याच्या आधीच हा अहवाल येणार असल्याचं सांगितलं जात आहे. त्यामुळे सत्तार यांची उमेदवारी राहणार की जाणार? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    सरपंच परिषदेच्या लढ्याला यश; ६ महिन्यांची प्रशासक म्हणून मुदतवाढ जाहीर

    February 21, 2026

    राजकीय वाद न्यायालयात; राहुल गांधींना पुन्हा जामीन

    February 21, 2026

    “मोठ्या लोकांचा पाठिंबा असल्यानेच धाडस?” : रोहित पवारांचा सवाल

    February 21, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.