Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » भरधाव वाहनाच्या धडकेत ३२ वर्षीय तरुण जागीच ठार
    क्राईम

    भरधाव वाहनाच्या धडकेत ३२ वर्षीय तरुण जागीच ठार

    editor deskBy editor deskOctober 10, 2024No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव : प्रतिनिधी

    शहरातील एका रुग्णालयातून काम संपवून घरी परतत असताना एका अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत यावल तालुक्यातील आडगाव येथील ३२ वर्षीय युवकाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी रात्री ११ वाजता ममुराबाद गावाजवळ घडली. जळगाव तालुका पोलिस ठाण्यात अज्ञात वाहनचालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    मिळालेल्या माहितीनुसार, राजेश दिलीप पाटील, असे मयत तरुणाचे नाव आहे. तो जळगाव शहरातील एका खासगी रुग्णालयातील पॅथॉलॉजी लॅबमध्ये कामाला होता. रात्री काम संपवून दुचाकीने आडगावला जायला निघाला. ममुराबाद गावाच्या पुढे यावलकडून जळगावकडे जाणाऱ्या एका अज्ञात वाहनाने राजेशच्या दुचाकीला धडक दिली. त्यात राजेशचा जागीच मृत्यू झाला.

    ममुराबाद येथील काही तरुणांनी घटनेची माहिती पोलिसांना कळवली. पोलिसांनी राजेशचा मृतदेह जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात आणला. तसेच मृतदेहाची ओळख पटल्यानंतर आडगाव येथील पुरुषोत्तम भालेराव या युवकाला अपघात झाल्याचे कळविले. त्यानंतर रात्रीच राजेशच्या नातेवाइकांनी जिल्हा रुग्णालयात गर्दी केली. राजेशच्या पश्चात आई, वडील, पत्नी, ८ वर्षांचा मुलगा, पाच महिन्यांची मुलगी, भाऊ, असा परिवार आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    अशोक खरात प्रकरणात नवे गूढ; एकाच तारखेला उघडली अनेक बँक खाती !

    April 5, 2026

    आकाशवाणी चौकात कुरीयर बॉक्स फोडला : अल्पवयीन चोरटा जेरबंद; मोबाईल चोरीचा पर्दाफाश

    April 5, 2026

    अमळनेरात थरार : घरात घुसून महिलेचा विनयभंग; पतीवर बॅटने जीवघेणा हल्ला !

    April 5, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.