
धरणगाव : प्रतिनिधी
येथील कल्पिताताई पाटील फाउंडेशन व राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष यांच्या वतीने दि. २२/१०/२६ गुरुवार रोजी “रथोत्सवात” सहभागी लेझीम पथक, ढोल पथक व शालेय पथकांचा सत्कार लोकनियुक्त नगराध्यक्षा लिलाताई सुरेश चौधरी व मान्यवरांच्या हस्ते पुष्पगुच्छ व स्मृतिचिन्ह देऊन उत्साहात संपन्न झाला.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, धरणगाव शहरातील वैभवसंपन्न परंपरा लाभलेल्या श्री बालाजी वहन व्यवस्थापक मंडळ यांच्या वतीने आयोजित अनेक भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या “बालाजी महाराजांच्या रथोत्सवात” सहभागी लेझीम पथक, ढोल पथक व शालेय पथकांचा सत्कार समारंभ मेन रोड कोट बाजार गणेश पान सेंटरजवळ उत्साहात पार पडला. रथ उत्सवात सहभागी भाविकांचे आयोजकांच्या वतीने शब्दसुमनांनी स्वागत करण्यात आले. गावातील व बाहेर गावातील राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, अध्यात्मिक, सांस्कृतिक, विधी व न्याय, वाणिज्य व व्यापार, पोलीस प्रशासन, क्रीडा व मनोरंजन, पत्रकारिता, शासकीय व प्रशासकीय इ. नानाविध क्षेत्रातील प्रतिष्ठित मान्यवरांचा तसेच रथाच्या मार्गावर केळी, सरबत, साबुदाणा खिचडी, पाणी इ. वाटप करणाऱ्या दात्यांचा पुष्पगुच्छ देऊन तसेच शब्दसुमनांनी यथोचित सन्मान करण्यात आला.
या पथकांचा झाला सन्मान…
🔹लेझीम पथक
१) बालकवी ठोंबरे लेझीम पथक
२) जय बजरंग व्यायाम शाळा
३) जयहिंद व्यायाम शाळा
४) भगवा ग्रुप मित्र परिवार
५) सावता माळी व्यायाम शाळा
६) हुतात्मा भगतसिंग व्यायाम शाळा
७) महात्मा फुले व्यायाम शाळा
८) राजपूत व्यायाम शाळा
🔹ढोल पथक…
१) शिवसंकल्प ढोल पथक
२) जयहिंद ढोल पथक
३) न्यू जयहिंद ढोल पथक
४) संत बाळूमामा ढोल पथक
५) बालाजी ग्रुप बालगोपाल ढोल पथक
६) माळी वाडा ढोल पथक
७) त्रिमूर्ती ढोल पथक
९) बाल गोपाल ढोल पथक
१०) बाल हनुमान ढोल पथक
यांच्यासह जय बजरंग सेनेच्या वतीने दुष्काळग्रस्त परिस्थितीत होरपळलेला शेतकरी आत्महत्या करण्यासाठी कसा प्रवृत्त होतो याचा उत्तम देखावा करून बालाजी महाराजांच्या चरणी साद घालण्याचा जो प्रयत्न करण्यात आला होता त्याने सर्व भाविकांचे लक्ष वेधून घेतले. या सर्व पथकांना कल्पिताताई पाटील फाउंडेशन व राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने तसेच लोकनियुक्त नगराध्यक्षा लिलाताई सुरेश चौधरी यांच्या शुभहस्ते पुष्पगुच्छ व स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून श्री बालाजी वहन व्यवस्थापक मंडळाचे अध्यक्ष प्रा डी आर पाटील, उपाध्यक्ष गुलाबरावजी वाघ, सचिव प्रशांत वाणी, पोलीस निरीक्षक उमाकांत गायकवाड, उदयोगपती जीवनसिंह बयस, माजी नगराध्यक्ष ज्ञानेश्वर महाजन, सुनिल घनशाम सोनार, माजी उपनगराध्यक्षा अरुणाताई कंखरे, डॉ. अर्चना काबरा, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या प्रदेश उपाध्यक्षा प्रतिभा शिरसाठ, महिला जिल्हाध्यक्षा कल्पिता पाटील, नगरसेविका ज्योती लक्ष्मण पाटील आदींची उपस्थिती होती.
कार्यक्रमाला श्री. बालाजी वहन व्यवस्थापक मंडळ, जगदंबा टेंट हाऊस, जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते चुडामण पाटील आदींचे अनमोल सहकार्य लाभले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष बाळासाहेब पाटील, राजेंद्र धनगर, तालुकाध्यक्ष संजय पाटील, कार्याध्यक्ष हितेंद्र पाटील, उपाध्यक्ष रमेश महाजन, जेष्ठ नेते नारायण चौधरी, अशोक झुंजारराव, शहराध्यक्ष लक्ष्मणराव पाटील, सचिव नंदूनाना धनगर, उपाध्यक्ष दिपक झुंजारराव, जेष्ठ पदाधिकारी अमित शिंदे, एकनाथ पाटील, कैलास मराठे, अमोल हरपे, मकरध्वज पवार, मोहन पाटील सर, खलील खान, युवक जिल्हा कार्याध्यक्ष मोहीत पवार, मीडिया तालुकाप्रमुख रविंद्र महाजन, युवक तालुकाध्यक्ष परेश गुजर, खजिनदार दिनकर पाटील, युवक शहराध्यक्ष जुनेद बागवान, उपाध्यक्ष बालाजी महाजन, कार्याध्यक्ष सागर महाले, संघटक बबलू पाटील, प्रफुल पवार, कृष्णा कंखरे, प्रविण पाटील, विद्यार्थी अध्यक्ष साहिल खान, आदेश भाई आदी पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे प्रस्ताविक मोहीत पवार यांनी तर सूत्रसंचालन लक्ष्मण पाटील सर यांनी केले.



