Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » भाजप आ. नितेश राणेंना धक्का; सिंधुदुर्ग सत्र न्यायालयाने जामीन अर्ज फेटाळला
    क्राईम

    भाजप आ. नितेश राणेंना धक्का; सिंधुदुर्ग सत्र न्यायालयाने जामीन अर्ज फेटाळला

    टीम लाईव्ह महाराष्ट्रBy टीम लाईव्ह महाराष्ट्रFebruary 1, 2022No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    सिंधुदुर्ग वृत्तसंस्था । भाजपा आमदार नितेश राणे यांचा अटकपुर्व जामीन सिंधुदुर्ग सत्र न्यायालयाने आज फेटाळून लावला आहे. दरम्यान, सत्र न्यायालयाच्या या निर्णयाविरोधात नितेश राणे जिल्हा न्यायालयात दाद मागणार आहेत.

    सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या निवडणूक रणधुमाळीत संतोष परब यांच्यावर झालेल्या हल्लाप्रकरणी नितेश राणे यांचा अटकपूर्व जामीन अर्ज सुप्रीम कोर्टाने गुरुवारी फेटाळला होता. यावेळी सुप्रीम कोर्टाने नितेश राणे यांना जिल्हा न्यायालयात शरण जाण्यास तसेच नियमित जामिनासाठी अर्ज करावा, असे निर्देश दिले होते. यासाठी कोर्टाने नितेश राणे यांना १० दिवसांची मुदत दिली होती.

    नितेश राणे यांच्या जामिनाबाबत झालेल्या कालच्या सुनावणीत सरकारी वकील म्हणून प्रदीप घरत यांनी युक्तीवाद केला. ते म्हणाले, ‘सुप्रीम कोर्टाने दिलेल्या आदेशानुसार, नितेश राणे यांनी पहिल्यांदा जिल्हा सत्र न्यायालयाला शरण यावे आणि मग नियमित जामिनासाठी अर्ज करावा, ही अट त्यांच्याकडून पाळली गेली का? तसंच हा हल्ला सुपारी देऊन करण्यात आलेलाच आहे. कारण आरोपींमधील कोणीही संतोष परब यांना ओळखत नाही. त्यामुळे ते हल्ला का करतील? त्यामुळे या प्रकरणाच्या योग्य तपासासाठी काही दिवसांची पोलीस कस्टडी आवश्यक आहे.’ असे म्हटले आहे.

    काय आहे नमके प्रकरण ?

    सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या निवडणूक रणधुमाळीत १८ डिसेंबर २०२१ रोजी संतोष परब यांच्यावर कणकवलीत हल्ला झाला होता. परब हे जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत यांचे निकटवर्तीय असून करंजे गावचे माजी सरपंच आहेत. त्यांच्यावर इनोव्हा कारमधून आलेल्या दोघांनी धारदार चाकूने वार केले होते. या हल्ल्यात परब जखमी झाले होते. शिवसेना कार्यकर्ते संतोष परब यांच्यावर झालेल्या हल्ल्याप्रकरणी भाजप आमदार नितेश राणे वादाच्या भोवर्‍यात अडकले आहेत.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    टीम लाईव्ह महाराष्ट्र
    • Website

    Related Posts

    भरधाव बोलेरोने उडवली जीवांची राख; तिहेरी धडकेत तिघांचा जागीच मृत्यू

    March 15, 2026

    नात्याला कालिमा : ३१ वर्षीय महिलेला गुंगीकारक पेय देवून अत्याचार !

    March 15, 2026

    शिवतीर्थावर राज ठाकरेंचा आक्रमक संदेश; गुढीपाडव्यात राजकीय वारे!

    March 15, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.