Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » राज्यात विसर्जन मिरवणूक दरम्यान १६ जणांचा दुर्देवी मृत्यू !
    क्राईम

    राज्यात विसर्जन मिरवणूक दरम्यान १६ जणांचा दुर्देवी मृत्यू !

    editor deskBy editor deskSeptember 18, 2024No Comments3 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    मुंबई : वृत्तसंस्था

    राज्यातील अनेक जिल्ह्यात लाडक्या बाप्पाला मोठ्या जल्लोषात निरोप दिला जात असतानाच अनेक ठिकाणी मोठ्या दुर्घटना घडल्या आहेत. यात अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे.बाप्पाच्या मुर्तीचे विसर्जन करताना बुडून मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. तर धुळ्यात विसर्जन मिरवणुकीत ट्रॅक्टरच्या चाकाखाली आल्याने 3 बालक ठार झाले आहेत. राज्यात गेल्या 24 तासात जवळपास 16 जणांचा मृत्यू झाला आहे.

    यामध्ये छत्रपती संभाजीनगरमध्ये मित्रांसोबत गणपती विसर्जनासाठी गेलेल्या 21 वर्षीय तरुणाचा घाणेगाव येथील तलावात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना मंगळवारी सायंकाळी घडली. अभय सुधाकर गावंडे असे बुडून मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. शहरापासून जवळ असलेल्या चितोड गावात गणेश विसर्जन मिरवणुकीत ट्रॅक्टर खाली आल्याने तीन बालके जागीच ठार झाली. परी बागुल, शेरा सोनवणे, लड्डू पवार अशी त्यांची नावे आहेत. विसर्जन मिरवणुकीत ट्रॅक्टरवरील चालक बदलताना हा अपघात झाला. या दुर्घटनेत सहा जण जखमी झाले आहेत. त्यांच्यावर भाऊसाहेब हिरे रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यापैकी एकाची स्थिती गंभीर आहे.त्याला अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले आहे.

    गणपती उत्सवाला धुळ्यात गालबोट लागले असून एक दुर्दैवी घटना उघडकीस आली आहे. गणपती बुडवण्यासाठी गेले असता तलावाच्या पाण्याचा अंदाज न आल्यामुळे या दोघेही भावांचा बुडून दुर्दैवी मृत्यू झाला आहे. त्यांच्यासह आणखी एक मित्र विसर्जनासाठी गेला होता परंतु तो मात्र सुदैवाने बचावला आहे. नाशिकमध्ये गणपती विसर्जन सुरू असताना मोठी दुर्घटना घडली आहे. गणपती विसर्जनाला गेलेल्या दोन तरुणांचा वालदेवी नदीपात्रात बुडून मृत्यू झाला आहे. विरारमध्ये गणपती विसर्जन करताना गणेश भक्ताचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला आहे. बुधवारी पहाटे साडेतीन वाजता ही दुर्दैवी घटना घडली आहे. गणपती विसर्जन करताना पाण्यात तरुणाला फिट येऊन तो पाण्यात बुडाला. अमरावती जिल्ह्यातील अचलपूर तालुक्यातील इसापूर येथे गणपती विसर्जनावेळी दोघे पूर्णा नगर नदीपात्रात वाहून गेल्याची घटना घडली आहे. दर्यापुर तालुक्यांतील दारापूर येथील गणपती विसर्जनात एक जण बुडाला.

    अकोला जिल्ह्यातील म्हैसांग येथील पूर्णा नदीवर गणेश विसर्जनावेळी 16 वर्षीय मुलाचा नदीत बुडून मृत्यू झाला. गणेश गायकवाड असे मृत मुलाचे नाव आहे. गणेश हा अकोला शहरातील अकोट फैल भागातील रहिवासी आहे. सायंकाळी गणेश हा आईसोबत घरगुती गणेशाचे विसर्जन करण्यासाठी म्हैसांग येथे पूर्णा नदीवर गेला होता. गणेश विसर्जनावेळी पाण्याचा अंदाज न आल्याने तो नदीत बुडाला. आईच्या आकांताने तातडीने विसर्जनासाठी आलेल्या नागरिकांनी त्याला पाण्याच्या प्रवाहातून बाहेर काढले आणि रुग्णालयात दाखल केले, मात्र, डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.

    नगरमध्ये गणपती विसर्जना दरम्यान 2 युवकांचा तलावात बुडून मृत्यू झाला आहे. मंगळवारी सायंकाळी विळद गावातील साकळाई तलाव इथं ही घटना घडली आहे. या घटनेनंतर परीसरात हळहळ व्यक्त केली. गणपती विसर्जन करताना चंद्रभागा नदीत एक जण बुडाल्याची माहिती समोर आली आहे. चंद्रभागा नदीवरील अहिल्या पुलावरून गणेशमूर्ती विसर्जन करताना तोल जाऊन 40 ते 50 फूट उंचीवरून नदीत पडला. मध्यरात्री एक वाजता ही दुर्दैवी घटना घडली.

    बुलडाण्याच्या जळगाव जामोदमध्ये विसर्जन मिरवणुकीला गालबोट लागले आहे.जळगाव जामोद शहरात विसर्जन मिरवणूक सुरू असताना येथील विसर्जन मिरवणुकीवर दगडफेक झाल्याची घटना घडली. सुमारे अर्धा तास ही दगडफेक सुरू होती. यामध्ये काही तरुण जखमी झाले. जळगाव जामोदमध्ये पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. परिस्थिती आता नियंत्रणात आहे. पण जामोदमधील विसर्जन मिरवणूक अजूनही पूर्ण झालेली नाही.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    अपघाताने उध्वस्त झाले प्रेमाचे स्वप्न; नववधू-वर जागीच ठार

    February 22, 2026

    जळगावच्या ७८३ ग्रामपंचायतींवर विद्यमान सरपंच प्रशासक !

    February 22, 2026

    विद्यापीठ व महाविद्यालयात दर्जेदार प्राध्यापकांसाठी मोठी भरती मोहीम

    February 22, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.