Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » ट्रक चोरीची ज्याने फिर्याद दिली त्यालाच घेतले ताब्यात !
    क्राईम

    ट्रक चोरीची ज्याने फिर्याद दिली त्यालाच घेतले ताब्यात !

    editor deskBy editor deskSeptember 14, 2024No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    यावल : प्रतिनिधी

    फुलगावजवळच्या हॉटेलवरून रात्रीच्या वेळी ट्रक चोरीस गेल्याप्रकरणी वरणगाव पोलिसांत गुन्हा दाखल झाला होता. याप्रकरणी पोलिसांनी केलेल्या तपासात चोरीत फिर्यादी ट्रक चालकाचाच सहभाग असल्याचे समोर आले असून, या ट्रक चालकासह अन्य दोघांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.

    मिळालेल्या माहितीनुसार, ट्रक चालक अरबाज खान तस्लीम (वय २७, रा. पाळधी, ता. धरणगाव) हा त्याच्या ताब्यातील ट्रक (एम. एच. ४३ – /वाय ८०८७) भुसावळ-वरणगाव महामार्गाने आणत असताना वरणगावनजीक महामार्गावरील हॉटेल वेस्टर्नसमोर ५ सप्टेंबर रोजी रात्री तो थांबला होता. मात्र, रात्री ट्रक चोरीला गेल्याचे सकाळी त्याने मालकाला – कळविले. याप्रकरणी ८ रोजी वरणगाव पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल करण्यात आली. त्यानुसार पोलिसांनी तपास चक्रे फिरवून ट्रक चोरीच्या घटनेतील फिर्यादी चालक अरबाज खान तस्लीम व त्याचा साथीदार क्लिनर तस्लीम अयुब खान (५४, रा. पाळधी) तसेच युसूफ खान अमीर (वय ४८, रा. जामनेर) यांना बुधवारी, ११ रोजी अटक केली. अद्याप ट्रक न मिळाल्यामुळे त्यांना तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    हर्षवर्धन सपकाळ यांच्या विधानाचे पडसाद : जळगावात भाजपने काढली प्रतिकात्मक अंत्ययात्रा !

    February 15, 2026

    “शिवरायांच्या नावावर राजकारण थांबवा” : सपकाळांचा भाजपला थेट इशारा

    February 15, 2026

    गॅस सिलिंडरचा स्फोट : तीन परिवाराचा संसार जळून खाक !

    February 15, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.