Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » झिका विषाणूंने काढले राज्यात डोकेवर
    आरोग्य

    झिका विषाणूंने काढले राज्यात डोकेवर

    editor deskBy editor deskSeptember 12, 2024No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    मुंबई : वृत्तसंस्था

    राज्यात नेहमीच पावसाळा सुरु झाला की अनेक आजार डोकं वर काढतात. सध्या राज्यात कोरोना, डेंग्यू, मलेरिया रुग्णांमध्ये वाढ होत आहे. त्यातच आता झिका विषाणूंच्या रुग्णांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. यामुळे आरोग्य विभाग सतर्क झाला आहे. राज्यात गेल्या आठवड्याभरापासून झिका विषाणूचा फैलाव मोठ्या प्रमाणात सुरु आहे. आता झिका विषाणूंचे महाराष्ट्रात किती रुग्ण याची आकडेवारी समोर आली आहे.

    गेल्या काही दिवसांपासून राज्यातील झिका विषाणूच्या रुग्णांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. आतापर्यंत महाराष्ट्रात 128 झिका रुग्णांची नोंद झाली आहेत. यात सर्वाधिक झिकाचे रुग्ण हे पुणे महापालिका हद्दीत पाहायला मिळत आहे. त्यामुळे आरोग्य विभागाकडून सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आलं आहे.

    महाराष्ट्रात झिका आजाराच्या रुग्णांमध्ये सतत वाढ होत आहे. सुदैवाने मुंबईत अजून एकाही रुग्णाला झिका विषाणूची लागण झालेली नाही. तर पुणे महापालिका हद्दीत 91, पुणे ग्रामीणमध्ये 9, पिंपरी-चिंचवड पालिका हद्दीत 6, अहमदनगर (संगमनेर) मध्ये 11, सांगली (मिरज) मध्ये 1, कोल्हापूरमध्ये 1, सोलापूरमध्ये 1 असे रुग्ण आढळून आले आहेत. याच पार्श्वभूमीवर आरोग्य विभागाने सतर्क राहा, असे आवाहन केले आहे. पुण्यात झिका विषाणूचा वाढता धोका लक्षात घेता आरोग्य विभागाकड़ून विविध उपाययोजना केल्या जात आहेत. पुणे महापालिकेचा आरोग्य विभाग हा सर्व रुग्णांवर लक्ष ठेवून आहे. गर्भवती महिलांना या विषाणूचा जास्त प्रमाणात धोका संभवतो. गर्भवती महिलांच्या गर्भावर या विषाणूचा परिणाम होऊ शकतो. यामुळे बाळाच्या डोक्यात जन्मजात दोष किंवा इतर समस्या उद्भवू शकतात, अशी माहिती आरोग्य अधिकाऱ्यांनी दिली.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    झेंडूच्या पिकाआड गांजाची शेती : २२ लाखांचा गांजा जप्त; शेतकरी पोलिसांच्या ताब्यात!

    October 19, 2026

    माणुसकीला काळिमा : तरुणाला नग्न करून अमानुष मारहाण; पार्श्वभागात पेट्रोल टाकल्याचा संतापजनक प्रकार!

    October 19, 2026

    बच्चू कडूंची पोलिसांना शिवीगाळ? चंद्रपुरातील भाषणाने मोठा वाद!

    October 19, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.