Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » सुरतच्या गणेश मंडपावर दगडफेक, 33 जणांना अटकेत
    क्राईम

    सुरतच्या गणेश मंडपावर दगडफेक, 33 जणांना अटकेत

    editor deskBy editor deskSeptember 9, 2024No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    सुरत : वृत्तसंस्था

    देशभरात दोन दिवसापूर्वी बाप्पांचे मोठ्या जल्लोषात आगमन झाले असून नुकतेच सुरतच्या लालगेट भागात गणेश उत्सवादरम्यान रविवारी रात्री उशिरा ६ तरुणांनी मंडपावर दगडफेक केली. याच्या निषेधार्थ हजारोंच्या संख्येने लोक रस्त्यावर उतरून आंदोलन करू लागले. दगडफेक करणाऱ्या सहाही जणांना अटक केल्याचे पोलिसांनी सांगितले. याशिवाय दगडफेकीच्या घटनेचे समर्थन करणाऱ्या 27 जणांनाही अटक करण्यात आली आहे.

    मिळालेल्या माहितीनुसार, अटक करण्यात आलेले लोक इतर धर्माचे आहेत, लोकांच्या निषेधाला रात्री उशिरा हिंसक वळण लागले. दोन्ही धर्माच्या लोकांमध्ये हाणामारीही झाली. वाहनांची तोडफोड करून जाळपोळ करण्यात आली. शांततेचे आवाहन करण्यासाठी आलेल्या स्थानिक आमदार कांती बलार आणि पोलिसांशीही बाचाबाची झाली. डीसीपी विजय सिंह गुर्जर आणि त्यांच्यासोबत असलेले आणखी एक पोलिस अधिकारी जखमी झाले.

    रात्री उशिरा पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी लाठीचार्ज केला. अश्रुधुराच्या नळकांड्याही फोडण्यात आल्या. सुरतमध्ये सुमारे 1000 पोलीस कर्मचारी तैनात करण्यात आले होते. मीडिया रिपोर्ट्सनुसार, पोलिसांनी 35 आंदोलकांना ताब्यात घेतले आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    अपघाताने उध्वस्त झाले प्रेमाचे स्वप्न; नववधू-वर जागीच ठार

    February 22, 2026

    जळगावच्या ७८३ ग्रामपंचायतींवर विद्यमान सरपंच प्रशासक !

    February 22, 2026

    विद्यापीठ व महाविद्यालयात दर्जेदार प्राध्यापकांसाठी मोठी भरती मोहीम

    February 22, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.