Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » तरुणीच्या खिश्यातून मोबाईल पळविला ; नागरिकांनी चोरट्याला प्रसाद दिला !
    क्राईम

    तरुणीच्या खिश्यातून मोबाईल पळविला ; नागरिकांनी चोरट्याला प्रसाद दिला !

    editor deskBy editor deskSeptember 8, 2024No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव : प्रतिनिधी

    कंपनीमधून घरी परतण्यासाठी बसमध्ये चढणाऱ्या तरुणीच्या खिशातून मोबाइल काढून पळ काढणारा चोरटा नागरिकांच्या सतर्कतेमुळे पोलिसांच्या जाळ्यात अडकला. मोबाइल चोरल्यानंतर चोरटा ज्या रिक्षात बसला, त्या रिक्षाला घेराव घातल्याने चोरी फसली. ही घटना शुक्रवारी (६ सप्टेंबर) रोजी आकाशवाणी चौकानजीक घडली. याप्रकरणी अर्षद शेख रईस (२१, रा. तांबापुरा) याला अटक केली आहे.

    मिळालेल्या माहितीनुसार, धरणगाव तालुक्यातील चोरगाव येथील एक तरुणी जळगावात कंपनीमध्ये नोकरीला आहे. शुक्रवारी संध्याकाळी ती घरी जाण्यासाठी आकाशवाणी चौकात एका बसमध्ये चढत असताना तिच्या खिशातून एकाने मोबाइल चोरला. मोबाइल काढल्याचे समजताच तरुणीने आरडाओरडा केला. त्यावेळी हा चोरटा एका रिक्षात बसून पळ काढणार तितक्यात नागरिकांनी रिक्षाला घेराव घातला व त्याला लोकांनी मार दिला. त्यावेळी त्याने मोबाइल बाजूला फेकला व तो सदर तरुणीच्या हाती लागला. याप्रकरणी तरुणीने रामानंदनगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून अर्षद शेख रईस याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्याला अटक करण्यात आली आहे. पुढील तपास पोलिस नाईक हेमंत कळसकर करीत आहेत.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    जळगाव महापालिकेत ‘नगरसेवक डायरी’ पुन्हा सुरू करण्याची नगरसेविका सौ. वैशाली पाटील यांची मागणी

    February 26, 2026

    कोट्यवधींच्या कर्जाचा स्फोट; जळगावातील ठाकरे गटाचा नेता अडचणीत!

    February 26, 2026

    भररस्त्यात कोयत्याने हल्ला; तरुण गंभीर जखमी

    February 26, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.