Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » जवान सुट्टीवर आला अन अपघातात दुर्देवी निधन
    क्राईम

    जवान सुट्टीवर आला अन अपघातात दुर्देवी निधन

    editor deskBy editor deskJuly 25, 2024No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    भडगाव : प्रतिनिधी

    तालुक्यातील वाडे येथील जवान समाधान सखाराम महाजन (वय २३) यांचे २४ रोजी मालपूरजवळ अपघातात निधन झाले.

    सविस्तर वृत्त असे कि, वाडे येथील सुपुत्र समाधान महाजन हे आर्मीमध्ये नोकरीला होते ते एका महिन्याच्या सुटीवर घरी आलेले होते. सुटी उपभोगून कर्तव्यावर हजर होण्यासाठी कामी परतीचा प्रवास करीत असताना मालपूरजवळ रेल्वे अपघातात त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती रेल्वे विभागाकडून परिवारास देण्यात आली. समाधान सखाराम महाजन हे ४० आरआरजेएनके, पुच्छ येथे कार्यरत होते. समाधान यांचे दीड वर्षांपूर्वीच लग्न झाले होते. ते सखाराम आनंदा महाजन यांचे एकुलते एक पुत्र होत. त्यांच्या पश्चात आई, वडील, दोन बहिणी, पत्नी, असा परिवार आहे. या घटनेची माहिती गाव परिसरात पोहोचताच वाडे गावासह संपूर्ण भडगाव तालुक्यात शोककळा पसरली आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    १३ वर्षांपासून कोमात, गाझियाबादच्या तरुणाला सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक इच्छामृत्यू निर्णय

    March 11, 2026

    जेवणासाठी उतरले… अन् एसटी बस पेटली : ५० प्रवासी थोडक्यात बचावले

    March 11, 2026

    दक्षता पेट्रोलपंप घोटाळा : उपनिरीक्षक वाघांकडून मुलाच्या खात्यात 10 लाख; सोन्याची खरेदी उघड

    March 11, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.