Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » जरांगे पाटलांचे उपोषण स्थगित ; खुर्ची ओढण्यासाठी तयारी करणार !
    राजकारण

    जरांगे पाटलांचे उपोषण स्थगित ; खुर्ची ओढण्यासाठी तयारी करणार !

    editor deskBy editor deskJuly 24, 2024No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    मुंबई : वृत्तसंस्था

    राज्यात गेल्या काही महिन्यापासून मराठा आरक्षण व ओबीसी आरक्षणाचा वाद सुरु होता त्यानंतर पुन्हा एकदा मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्याच्या मागणीसाठी जरांगे पाटील बेमुदत उपोषणाला बसले होते. मात्र बुधवारी अखेर आपले उपोषण मागे घेतले आहे. त्यांनी सरकारला आपल्या मागण्यांसाठी 13 ऑगस्टपर्यंतची मुदत दिली आहे. सलाईन लावून घेत उपोषण करण्यात अर्थ नाही. समाजानेही उपोषण सोडण्याचा हट्ट धरला आहे. आरक्षणासोबतच आम्हाला तुम्हीही हवे आहात असे त्यांचे म्हणणे आहे, असे जरांगे यांनी आपले उपोषण स्थगित करताना म्हटले आहे.

    मनोज जरांगे पाटील पुढे बोलताना म्हणाले की, मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी लढा देणारे मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी 5 व्या दिवशी उपोषण मागे घेतले. समाज बांधवांच्या हस्ते पाणी पिऊन त्यांनी उपोषण सोडले. मी माझ्या मनातून आंदोलन स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे. सलाईन घेऊन शरीराला काही होत नाही, असे आंदोलन करण्यात काही हरकत नाही. शंभूराज देसाई यांनी दोन महिन्याचा वेळ मागितला होता, तो आम्ही देत आहोत.

    सरकार आमरण उपोषण शक्तीला घाबरत आणि त्यांच्या सत्तेच्या खुर्चीला घाबरतात मला उपोषण करू द्या म्हणून मी गावकऱ्यांना म्हणत होतो रात्री गावकऱ्यांनी ऐकलं नाही त्यांनी मला सलाईन लावले सलाईन वर पडू न राहण्यात उपयोग नाही, त्यापेक्षा न केलेले बरे या मतावर मी आलो आहे तिथे पडून राहण्यापेक्षा मी मतदार संघाची तयारी करेल असे मनोज जरांगे यांनी म्हटले आहे.

    मनोज जरांगे पाटील म्हणाले की, सरकारचा ज्या खुर्चीत जीव आहे, ती खुर्ची ओढण्यासाठी आता मला तयारी करावी लागेल. मी इथे झोपून कशाला वेळ घालू. त्यापेक्षा मला राज्यात फिरता येईल. सभा, रॅली करता येईल. विधानसभेसाठी तयारी करता येईल. पण, असे झोपून राहून काहीच उपयोग होणार नाही. कोणी भेटायला आला नाही म्हणून मला फरक पडत नाही. मी मराठा आहे, जातीवंत मराठा आहे. खानदानी आहे. माझ्या शक्तीच्या बळावर मी आंदोलन करतो. मी न्याय हिसकावून आणतो.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    राजकीय वजन वाढवण्याची शिकवण, भावनिक आठवणींचा धगधगता प्रवास ; रोहित पवार !

    February 23, 2026

    रुग्णालयात पाच दिवसाच्या नवजात मुलीला सोडून आई फरार !

    February 23, 2026

    चेन्नईच्या समुद्रात जळगावचा जय बेपत्ता; कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर

    February 23, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.