Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » शाळेच्या मैदानात आली चक्कर, १५ वर्षीय मुलाचा मृत्यू
    अमळनेर

    शाळेच्या मैदानात आली चक्कर, १५ वर्षीय मुलाचा मृत्यू

    editor deskBy editor deskJuly 13, 2024No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    अमळनेर : प्रतिनिधी

    तालुक्यातील येथील शारदा माध्यमिक विद्यालयाच्या इयत्ता नववीतला विद्यार्थी घनश्याम जितेंद्र महाजन (वय १५) हा संध्याकाळी ४:३० च्या सुमारास शाळेत मैदानात खेळत असताना अचानक चक्कर येऊन पडला. त्याचवेळी त्याचे निधन झाले.

    मिळालेल्या माहितीनुसार, घनःश्याम पडल्यानंतर लगेचच त्याला शिक्षकांनी सावरले व स्थानिक डॉक्टरांनी तपासणी केली. त्याच्यावर प्रथमोपचार केले व त्वरित अमळनेर येथे खासगी दवाखान्यात दाखल केले. त्यानंतर त्याला अमळनेर ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले. तेथे वैद्यकीय अधिकारी डॉ. जी. एम. पाटील यांनी तपासून मृत घोषित केले. घनश्याम हा आई-वडिलांचा एकुलता मुलगा होता. अत्यंत नम्र व हुशार असलेला हा गुणी विद्यार्थी क्रीडा, नाटक सांस्कृतिक कार्यक्रम इत्यादी सर्व कार्यक्रमांत भाग घेणारा विद्यार्थी होता. यावेळी संस्थाध्यक्ष, मुख्याध्यापक, सर्व शिक्षक यांनी अमळनेर ग्रामीण रुग्णालयात धाव घेतली. त्याच्या पश्चात आई-वडील, आजी आजोबा, काका व दोन बहिणी असा परिवार आहे. अमळनेर ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन होऊन मारवड पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    राज्यात उष्णतेचा कहर, अवकाळी पावसाचा तडाखा : दुहेरी संकटात शेतकरी-नागरिक हैराण

    April 18, 2026

    धक्कादायक : मास्टर कॉलनी तरुणाने संपविले आयुष्य !

    April 18, 2026

    बिबानगरात ‘रोमिओ’चा हैदोस : विद्यार्थिनीचा छळ, घरावर दगडफेक

    April 18, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.