Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » आरोपीच्या ताब्यासाठी जमावाने केला पोलिस ठाण्यावर हल्ला
    क्राईम

    आरोपीच्या ताब्यासाठी जमावाने केला पोलिस ठाण्यावर हल्ला

    editor deskBy editor deskJune 21, 2024No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जामनेर : प्रतिनिधी

    तालुक्याच्या एका गावातील अल्पवयीन मुलीवर अत्याचार व तिचा खून करून पसार झालेल्या सुभाष उमाजी भिल (वय ३५) या आरोपीला गुरुवारी पोलिसांनी जेरबंद केले. त्यानंतर त्याला आपल्या ताब्यात द्यावे, अशी मागणी करत जमावाने जामनेर पोलिस ठाण्यावर हल्ला केला. ही घटना गुरुवारी रात्री १०:३० वाजण्याच्या सुमारास घडली. पोलिसांनी हल्ला करणाऱ्या १० ते १२ जणांना रात्रीच ताब्यात घेतले होते.

    मिळालेल्या माहितीनुसार,  यावेळी संतप्त जमावाने दगडफेकही केली. त्यात पोलिस निरीक्षक किरण शिंदे यांच्यासह १० पोलिस कर्मचारी जखमी झाले आहेत. जमावाला पांगविण्यासाठी पोलिसांना हवेत गोळीबार करावा लागला. पोलिसांनी अश्रूधुराच्या नळकांड्या फोडल्या, तरीही जमाव शांत होत नव्हता, जमावाच्या दगडफेकीत पोलिस ठाण्याच्या काचा फुटल्या. संतप्त जमावाने एक दुचाकी जाळली, अनेक वाहनांच्या काचा फोडल्या. पोलिस ठाण्याबाहेर पोलिसांच्या दुचाकींची तोडफोड करण्यात आली.

    जखमी पोलिस निरीक्षक किरण शिंदे यांच्यावर खासगी दवाखान्यात उपचार सुरू आहेत. या दगडफेकीत रामदास कुंभार, हितेश महाजन, रमेश कुमावत, संजय राखुंडे, प्रीतम बरकले, संजय खंडारे, सुनील राठोड, मुकुंदा पाटील हे पोलिस कर्मचारी जखमी झाले आहेत.

    भुसावळ शहरात सुभाष भिल यास भुसावळ पोलिसांनी झुगादेवी परिसर या भागातून गुरुवारी संध्याकाळच्या सुमारास ताब्यात घेतले. याची माहिती आदिवासी बांधवांना मिळतात त्यांनी इसका फैसला हम करेंगे अशी अशी भूमिका घेतली. आरोपीला ताब्यात द्यावे, यासाठी नाहाटा चौफुलीवर जमाव अनियंत्रित होऊ नये, म्हणून पोलिसांना सौम्य लाठीचार्ज करावा लागला. पोलिसांचा मोठा फौजफाटा आणि भुसावळ नगरपालिकेचे अग्निशमन बंब जामनेरकडे गुरुवारी रात्री उशिरा रवाना झाले. आदिवासी समाजाला शांततेचे आवाहन करीत डीवायएसपी कृष्णात पिंगळे, पोलिस निरीक्षक गजानन पडघन, पोलिस निरीक्षक संदीप रणदिवे यांच्यासह कर्मचाऱ्यांनी परिस्थितीवर नियंत्रण मिळवले.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    इस्लामाबादमध्ये नमाजवेळी मशिदीत भीषण बॉम्बस्फोट; 50 ठार, 70 हून अधिक जखमी

    February 6, 2026

    पोलीस–वन विभागात नोकरी लावण्याचे आमिष; चाळीसगावात ६ लाखांची फसवणूक

    February 6, 2026

    किरकोळ वादातून मारहाण ; शुभम सपकाळेचा उपचारादरम्यान मृत्यू

    February 6, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.