Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » जय मल्हार क्रांती संघटनेचा महायुतीच्या उमेदवार स्मिताताई वाघ यांना जाहीर पाठींबा,
    चाळीसगाव

    जय मल्हार क्रांती संघटनेचा महायुतीच्या उमेदवार स्मिताताई वाघ यांना जाहीर पाठींबा,

    editor deskBy editor deskMay 3, 2024No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    चाळीसगाव : प्रतिनिधी

    स्वातंत्र्यानंतर प्रथमच राजे उमाजी नाईक यांच्या स्मारकासाठी पुरेसा निधी, रामोशी-बेडर समाजासाठी आर्थिक विकास महामंडळ आणि त्यासाठी आवश्यक निधी, भटक्या विमुक्तांना जात प्रमाणपत्रासाठी शासनाचे स्वतंत्र अभियान, एकूणच संपूर्ण समाजाच्या उन्नतीसाठी महायुती शासनाची सकारात्मक भूमिका यामुळे महाराष्ट्र राज्यातील प्रत्येक लोकसभा मतदारसंघात जय मल्हार क्रांती संघटनेच्यावतीने महायुतीच्या उमेदवारांना पाठिंबा जाहीर केला आहे.

    महायुतीच्या सर्व उमेदवारांना जास्तीत जास्त मतांनी विजयी करण्याचा संकल्प जय मल्हार क्रांती संघटनेचे महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष श्री. दौलतनाना शितोळे साहेब यांनी केला असून जळगाव लोकसभेच्या महायुतीच्या उमेदवार स्मिताताई वाघ यांना जाहीर पाठिंब्याचे पत्र जय मल्हार क्रांती संघटनेचे जळगाव जिल्हयातील सर्व पदाधिकारी यांच्यावतीने चाळीसगाव मतदारसंघाचे आमदार मंगेशदादा चव्हाण यांच्याकडे सुपूर्द करण्यात आले.

    यावेळी जय मल्हार क्रांती संघटनेचे महाराष्ट्र राज्य सहकार्याध्यक्ष रमेश वाघ, जळगाव जिल्हाध्यक्ष अंकुश वाघ, राज्य कार्यकारणी सदस्य रवींद्र सूर्यवंशी, जिल्हा कार्याध्यक्ष संतोष वाघ, उपाध्यक्ष नगराज वाघ, सचिव ज्ञानेश्वर सूर्यवंशी, चाळीसगाव तालुका उपाध्यक्ष भास्कर मोरे, सचिव विशाल वाघ, तालुकाध्यक्ष भगवान जाम, दीपक काकडे, प्रकाश वाघ, रवींद्र शिंदे, नितीन सूर्यवंशी, आबा सूर्यवंशी, रमेश वाघ, राजेंद्र शिंदे आदी उपस्थित होते.

    जय मल्हार क्रांती संघटनेच्या जाहीर पाठींब्यामुळे चाळिसगाव, भडगाव, पाचोरा, तालुक्यात मोठ्या प्रमाणात असलेल्या रामोशी, बेडर समाजाची ताकद महायुतीला मिळणार असून स्मिताताई यांच्या मताधिक्यात वाढ होणार आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    पोलिसांचा ‘एमपीडीए’चा धडाका ; चाळीसगावच्या वाजिद खानची नागपूर कारागृहात रवानगी !

    August 27, 2026

    कन्नड घाटात एसटी बसचा थरार! स्टेअरिंग रॉड तुटला; ५९ प्रवाशांचा जीव थोडक्यात बचावला

    August 23, 2026

    शालार्थ घोटाळ्याची व्याप्ती राज्यभर : ‘बड्या’ संस्थाचालकांनाही चौकशीच्या कक्षेत आणा; जळगावात संशयित कर्मचाऱ्यांचे वेतन पडताळणीनंतरच !

    August 20, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.