Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » पतंजलीला मोठा धक्का : १४ उत्पादनांवर बंदी
    राजकारण

    पतंजलीला मोठा धक्का : १४ उत्पादनांवर बंदी

    editor deskBy editor deskMay 2, 2024No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    नवी दिल्ली : वृत्तसंस्था

    बाबा रामदेव यांच्या पतंजलीला आणखी एक मोठा धक्का बसला आहे. योगगुरू रामदेव यांच्या मालकीच्या पतंजली या आयुर्वेदिक कंपनीवर उत्तराखंड सरकारने कारवाई सुरू केली आहे. उत्तराखंड सरकारने पतंजलीच्या 14 उत्पादनांवर बंदी घातली आहे. उत्तराखंड औषध नियंत्रण विभागाच्या परवाना प्राधिकरणाने पतंजलीच्या दिव्या फार्मसी कंपनीच्या उत्पादनांवर ही बंदी घातली आहे.

    तसेच रामदेव, आचार्य बाळकृष्ण आणि पतंजली यांच्याविरोधात ड्रग्ज आणि मॅजिक रेमेडीज कायद्याचं उल्लंघन केल्याप्रकरणी फौजदारी तक्रारही दाखल करण्यात आली आहे. न्यायालयाच्या आदेशांचे उल्लंघन केल्याप्रकरणी रामदेव आणि पतंजलीचे व्यवस्थापकीय संचालक बाळकृष्ण यांच्याविरुद्ध सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू असताना ही कारवाई करण्यात आली आहे. उत्तराखंड सरकारने सर्वोच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र दिले आहे. या शपथपत्रात उत्तराखंड सरकारने बाबा रामदेव यांच्या कंपनीवर ड्रग अँड मॅजिक रेमेडीज कायद्यांतर्गत काय कारवाई केली हे सांगितले. उत्तराखंड सरकारने 15 एप्रिलच्या आदेशाने तंजलीच्या 14 उत्पादनांचे परवाने निलंबित केल्याचे सांगण्यात आले.

    या उत्पादनांवर बंदी
    श्वासरी गोल्ड, श्वासरी वटी, दिव्या ब्रॉन्कॉम, श्वासरी प्रवाही, श्वासरी अवलेह, मुक्ता वटी एक्स्ट्रा पॉवर, लिपिडॉम, बीपी ग्रिट, मधुग्रिट, मधुनाशिनी वटी एक्स्ट्रा पॉवर, लिवामृत ॲडव्हान्स, लिवोग्रिट गोल्ड, आणि पतंजली दृष्टी आय ड्रॉप.

    पतंजलीच्या काही उत्पादनांच्या दिशाभूल करणाऱ्या जाहिराती थांबवण्यासाठी दिलेल्या निर्देशांचे पालन न केल्याबद्दल सर्वोच्च न्यायालयाने काही काळापूर्वी बाबा रामदेव यांची ताशेरे ओढले होते. पतंजली प्रकरणावर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार असून योगगुरू स्वामी रामदेव यांच्यावर अवमानाचा गुन्हा दाखल करायचा की नाही याचा निर्णय घेतला जाणार आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    “अजित पवारांचा अपघात अपघात नाही? रोहित पवारांचा VSR–DGCAवर धक्कादायक आरोप!”

    February 24, 2026

    वेश्याव्यवसायावर पोलिसांचा छापा : दोन दलालांना अटक

    February 24, 2026

    लाडकी बहिणींना जानेवारीचा हप्ता; लाखो महिलांच्या खात्यात जमा

    February 24, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.