Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » आ.खडसेंच्या भाजप प्रवेशावर शरद पवारांचे मोठे विधान
    राजकारण

    आ.खडसेंच्या भाजप प्रवेशावर शरद पवारांचे मोठे विधान

    editor deskBy editor deskApril 21, 2024No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव : प्रतिनिधी

    आज जळगाव जिल्ह्यातील रावेर लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार एक मोठे विधान केले आहे.

    खडसेंनी नाईलाजाने निर्णय घेतला असावा. त्यांच्यावर तपास यंत्रणांचादबाव होता असे मोठे विधान यांनी केले आहे. यावेळी ते बोलत होते. त्यांनी यावेळी मोदींची हुकूमशाही राजवट उद्ध्वस्त झाल्याशिवाय राहणार नाही असा हल्लबोलही केला आहे. यावेळी शरद पवारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर देखील निशाणा साधला आहे. ”आज देशाचे चित्र बदललेले आहे. जो देश धान्य आयात करत होता. आता तोच देश निर्यात करत आहे. आज मोदी यांचे राज्य आहे.

    बळीराजाला मदत होईल असे काही सरकारकडून केले जात नाही. जवाहरलाल नेहरू यांच्यावर टीका केली जात आहे. ज्यांनी देशासाठी खस्ता खायल्या आहेत त्यांच्यावर टीका करणे हे काय पंतप्रधानांचे काम आहे का? आपण देशाचे पंतप्रधान आहे हे लक्षात ठेवले पाहिजे. ते भाजपचे पंतप्रधान असल्यासारखे वागत आहेत” असे शरद पवार म्हणाले.

    पुढे पवार म्हणाले, ”आज दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. मात्र शासकीय यंत्रणेचा उपयोग हुकूमशाहीसारखा केला जात आहे. मुख्यमंत्र्यांना तुरुंगात टाकले जात आहे याचा अर्थ ही हुकूमशाही आहे. एखाद्याला वैयक्तिक त्रास देण्याचं काम सुरू आहे. यापूर्वी असं कधी होत नव्हतं. त्यामुळे अनेकांना यातना सहन कराव्या लागत आहेत. याचाच प्रभाव खडसेंवर झाला असावा. त्यांच्यावरही तपास यंत्रणांचा दबाव होता. त्यामुळेच त्यांनी नाईलाजाने असा निर्णय घेतला असावा”, असे शरद पवार म्हणाले.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    भाजप प्रदेश माध्यम विभागात मोठा फेरबदल – राज्यभर नव्या प्रवक्त्यांची नियुक्ती जाहीर!

    April 21, 2026

    “डॉलरचे पार्सल” ठरले सापळा; भीती आणि आमिषाने ३.४७ लाखांची ऑनलाईन लूट

    April 21, 2026

    बीडमध्ये धक्कादायक प्रकार; सावत्र मुलासोबत महिला फरार

    April 20, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.