Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » मंत्री भुजबळांचा हा तर धंदा ; जरांगे पाटलांची टीका
    राजकारण

    मंत्री भुजबळांचा हा तर धंदा ; जरांगे पाटलांची टीका

    editor deskBy editor deskApril 9, 2024No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    नाशिक : वृत्तसंस्था

    लोकसभा निवडणुकीसाठी सर्वच पक्षातील नेत्यांनी आपल्या पक्षाची भूमिका जाहीर करण्यासाठी अनेक ठिकाणी जाहीर सभाच धुमाकूळ सुरु झाला असून त्यात राज्यात गेल्या काही वर्षापासून सुरु असलेल्या मराठा समजाच्या आंदोलनावर पुन्हा एकदा मनोज जरांगे पाटलांनी आक्रमक पवित्रा घेतला असून त्यांनी आता मंत्री छगन भुजबळ यांच्यावर टीकास्त्र सोडले आहे.

    जरांगे पाटील सोमवारी नाशिक दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी मंत्री छगन भुजबळ यांच्यासह महाविकास आघाडी आणि महायुतीवर जोरदार निशाणा साधला आहे. निवडणुकीला उभे राहून स्वतः मोठे होऊन गोरगरिबांच्या पोटावर पाय देणे हा भुजबळांचा धंदा आहे अशी टीका मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी केली आहे. तसेच आता राज्यात महायुती आणि महाविकास आघाडीला आम्ही पाडणार असा इशारा देखील त्यांनी दिला आहे.

    छगन भुजबळ यांच्यावर जरांगे यांनी पुन्हा एकदा जहरी टीका केली आहे. ”निवडणुकीला उभे राहून स्वतः मोठे होऊन गोरगरिबांच्या पोटावर पाय देणे हा भुजबळांचा धंदा आहे. ओबीसीमध्ये आमच्या नोंदी सापडल्या आहेत. भुजबळ आणखी किती दिवस खोटं बोलणार आहेत. तुम्ही विरोध करत राहा, मी मराठ्यांना ओबीसीमधून आरक्षण घेऊनच दाखवणार”, असा इशारा मनोज जरांगेनी भुजबळांना दिला आहे. यावेळी मनोज जरांगे यांनी महाविकास आघाडी आणि महायुती दोन्हीकडून मराठा समाजाची फसवणूक झाल्याचे म्हंटले आहे. ते म्हणाले की, सर्व जण सारखेच आहेत. तिघांनी मिळून षड्यंत्र केले. किती दिवस मराठ्यांची फसवणूक करणार आहात. मागच्या काळात आमचा महाविकास आघाडीने कार्यक्रम केला आणि आताही महायुतीच्या सरकारने तेच केले आहे. या दोघांना निवडणुकीत पाडा”, असे मनोज जरांगे पाटलांनी म्हंटले आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    मराठा आरक्षणात सहा महिन्यांचा दिरंगाई; फक्त ९८ जणांना मिळाले प्रमाणपत्र !

    February 24, 2026

    आदित्य ठाकरेंनी अधिवेशनात सरकारला धरले धारेवर, लाडकी बहीण, प्रदूषण आणि भ्रष्टाचाराचे प्रश्न!

    February 24, 2026

    “अजित पवारांचा अपघात अपघात नाही? रोहित पवारांचा VSR–DGCAवर धक्कादायक आरोप!”

    February 24, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.