Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » मोठी बातमी : शिंदेंचे सात खासदार ठाकरेंच्या संपर्कात ?
    राजकारण

    मोठी बातमी : शिंदेंचे सात खासदार ठाकरेंच्या संपर्कात ?

    editor deskBy editor deskApril 5, 2024No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    मुंबई : वृत्तसंस्था

    मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेचे 7 खासदार उद्धव ठाकरे यांच्या संपर्कात असल्याचा दावा त्यांनी केला असून शिंदे गटाचे निम्मे खासदार उद्धव ठाकरेंच्या संपर्कात आहेत, असे ते म्हणाले. वडेट्टीवार यांच्या या दाव्यामुळे महायुतीच्या विशेषतः शिंदेंच्या गोटात मोठी खळबळ माजली आहे. महायुतीच्या जागावाटपात शिवसेनेच्या अनेक विद्यमान खासदारांचा पत्ता कट झाला आहे. त्यामुळे हे नाराज खासदार स्वगृही म्हणजे उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेत परतण्याच्या विचारात असल्याची चर्चा आहे. त्यात विजय वडेट्टीवार यांनी उपरोक्त दावा केल्यामुळे या चर्चेला चांगलीच हवा मिळाली आहे. शिंदेंच्या 7 खासदारांची काय गत झाली? उद्धव ठाकरे भेटत नसल्याची ओरड करणाऱ्यांना आता जागाही भेटत नाही. त्यांचे निम्मे खासदार उद्धव ठाकरे यांच्या संपर्कात आहेत, असे विजय वडेट्टीवार यांनी म्हटले आहे.

    विजय वडेट्टीवार यांनी यावेळी भाजपचे पुन्हा सत्ता मिळवण्याचे स्वप्न धुळीस मिळवण्याचाही संकल्प व्यक्त केला. सद्यस्थितीत शिवसेनेचा शिंदे व राष्ट्रवादी काँग्रेसचा अजित पवार गट गोंधळलेल्या स्थितीत आहे. भाजपचीही मोठी दमछाक सुरू आहे. त्यामुळे विरोधी पक्षांची इंडिया आघाडी भाजपचे पुन्हा सत्ता मिळवण्याचे स्वप्न निश्चितच धुळीस मिळवेल, असे ते म्हणाले. ते पुढे बोलताना म्हणाले की, विदर्भात काँग्रेसला प्रचंड पोषक परिस्थिती आहे. पहिल्या टप्प्यातील पाचही जागांवर जनता काँग्रेसला आपला कौल देईल. विद्यमान सरकार विरोधात जनतेत प्रचंड राग व चीड आहे. सरकार हुकूमशाही पद्धतीने काम करत आहेत. त्यामुळे स्वतंत्र भारताचे उद्या आपण गुलाम होऊ अशी भीती लोकांना वाटत आहे. परिणामी, लोकांनीच आता भाजपला सत्तेतून बेदखल करण्याचा निश्चय केला आहे. गडचिरोली लोकसभा मतदार संघ काँग्रेस जिंकेल. या ठिकाणी भाजपला दुसरा पर्याय मिळाला नसल्यामुळे काँग्रेसचे किरसान सहज निवडून येतील, असा विश्वासही विजय वडेट्टीवार यांनी यावेळी व्यक्त केला.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    मराठा आरक्षणात सहा महिन्यांचा दिरंगाई; फक्त ९८ जणांना मिळाले प्रमाणपत्र !

    February 24, 2026

    आदित्य ठाकरेंनी अधिवेशनात सरकारला धरले धारेवर, लाडकी बहीण, प्रदूषण आणि भ्रष्टाचाराचे प्रश्न!

    February 24, 2026

    “अजित पवारांचा अपघात अपघात नाही? रोहित पवारांचा VSR–DGCAवर धक्कादायक आरोप!”

    February 24, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.