Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » आतेभावाशी लग्न लावल्याचा संशय : नवरदेवाच्या अंगावर गाडी चढवली
    क्राईम

    आतेभावाशी लग्न लावल्याचा संशय : नवरदेवाच्या अंगावर गाडी चढवली

    editor deskBy editor deskMarch 29, 2024No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    छत्रपती संभाजी नगर : वृत्तसंस्था

    प्रेमप्रकरणातून चुलत बहिणीचे आतेभावाशी लग्न लावून दिल्याच्या संशयावरून मावस काकाच्या मुलाने नवरदेवाच्या अंगावर चार वेळा गाडी घालून चिरडल्याची भयंकर घटना गुरुवार, २८ मार्च रोजी दुपारी १ वाजता वाळूज पोलिस ठाण्याच्या हद्दीतील सावखेडा रोडवरील शेंदुरवादा येथे घडली. नवरदेव आणि त्याचे वडील लग्नासाठी बँकेत पैसे काढायला गेले होते.

    पुढच्या आठवड्यात विवाह असल्याने वडीलांसोबत बॅकेतून पैसे काढण्यासाठी गेलेल्या एका 24 वर्षीय तरूणाच्या दुचाकीला जोरदार धडक देत त्याच्या अंगावर चार वेळेस बोलेरो घालून हत्या करण्यात आली. एखाद्या सिनेमालाही लाजवेल असा हा धक्कादायक प्रकार गुरूवारी 28 मार्चला दुपारी 1 च्या सुमारास वाळुज पोलिस ठाण्याच्या हद्दीतील शेंदुरवादा- सावखेडा रस्त्यावर घडला.
    पवन शिवराम लोढे वय 24 वर्षे राहणार जुने ओझर ता. गंगापुर असे मृत तरूणाचे नाव आहे. बहिणीच्या प्रेमविवाहामध्ये सहकार्य केल्याचा राग मनात धरून ही हत्या केल्याचा अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे.

    पोलिस व नातेवाईकांनी दिलेल्या माहितीनुसार, पवन हा शेतकरी असून त्याच्या मामाचा मुलगा विशाल लक्ष्मण नवले (वय – 26 रा. चितेगाव ता. पैठण) याने संशयित आरोपी सचिन वाघचौरे, व विशाल वाघचौरे दोघे रा. धुपखेडा ता पैठण याच्या बहिणीशी पळून जावून विवाह केला होता. विशेष म्हणजे संशयीत आरोपी वाघचौरे व विशाल नवले हे नातेवाइक देखील आहेत. दोघांनी कोर्ट मॅरेज देखील केले होते. त्यांच्या विवाहाला पवन याने मदत केल्याचा राग मनात धरून गुरूवारी बोलेरोने पवनच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. या धडकेत पवन त्याचे वडील दुचाकीवरून खाली पडले. त्यानंतर चार वेळेस संशयीत आरोपी यांनी पवनच्या अंगावर बोलेरो घातली. वडिलांनी हात जोडून विनवणी केली, परंतु सुडाने पेटलेल्या संशयीत वाघचौरे याने वडील शिवराम लोढे यांच्या पायावरून बोलेरो घातली. त्यामुळे ते जखमी झाले. धडकेत जबर जखमी झालेल्या पवनच्या डोक्यावरून बोलेरो घातली. पळून जाण्याच्या तयारीत असतांना बोलेरोचे नियंत्रण सुटल्याने ती रस्त्याच्या खड्यात गेली.

    आरोपी हे इतर दुचाकीवर आलेल्या साथीदारासोबत सुसाट वेगात पसार झाले. घटनेची माहिती मिळताच वाळुज पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक हे पथकासह घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी दोन्ही गंभीर जखमींना घाटीत दाखल केले असता, तेथील डॉक्टरांनी पवनला मृत घोषित केले तर वडील शिवराम लोढे यांच्यावर घाटीत उपचार सुरू आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    मराठा आरक्षणात सहा महिन्यांचा दिरंगाई; फक्त ९८ जणांना मिळाले प्रमाणपत्र !

    February 24, 2026

    आदित्य ठाकरेंनी अधिवेशनात सरकारला धरले धारेवर, लाडकी बहीण, प्रदूषण आणि भ्रष्टाचाराचे प्रश्न!

    February 24, 2026

    “अजित पवारांचा अपघात अपघात नाही? रोहित पवारांचा VSR–DGCAवर धक्कादायक आरोप!”

    February 24, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.