Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » अंगणवाडी सेविकेला विवस्त्र करण्याचा प्रयत्न
    क्राईम

    अंगणवाडी सेविकेला विवस्त्र करण्याचा प्रयत्न

    editor deskBy editor deskMarch 23, 2024No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    बुलढाणा : वृत्तसंस्था

    राज्यातील अनेक शहरात गुन्हेगारी घटना घडत असतांना एक थरारक घटना बुलढाण्यातून समोर आली आहे. जागेच्या वादातून अंगणवाडी सेविकेला विवस्त्र करण्याचा प्रयत्न करत अमानुष मारहाण केल्याची भयंकर घटना घडली असून मारहाण करणाऱ्या नराधमाच्या तावडीतून सोडविण्यासाठी महिलेचा भाऊ पुढे आला. तेव्हा त्याला देखील बेदम मारहाण करून दहशत निर्माण करण्यात आली. सदर घटनेमुळे परिसरात एकच खळबळ पसरली आहे.

    मिळालेल्या माहितीनुसार, अंगणवाडी सेविकाने तातडीने मेहकर पोलिसांत धाव घेतली. दिलेल्या तक्रारीवरून तीन आरोपींवर अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती कायद्यासह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पीडित महिला ही तिच्या आईसोबत मेहकर येथील अण्णाभाउ साठे नगर येथे असलेल्या मोकळ्या जागेची साफसफाई करत होत्या. तेवढ्यात असलम गवळी आणि त्याचे दोन भाऊ जावेद गवळी तसेच फिरोज गवळी तेथे आला आणि ‘आमच्या जागेवर काय करत आहे? येथुन निघुन जा, असे म्हणत त्यांनी महिलेला मारहाण करण्यास सुरुवात केली. त्यांनी तिला इतकं बेदम मारलं की, महिलेचे कपडेही फाडले.

    आपल्या बहिणीची मारहाण होत असल्याचं समजताच भावाने त्या ठिकाणी तातडीने धाव घेतली. यावेळी बहिणीची अवस्थापाहून भावाने भावाने तिला मारहाण करणाऱ्यांशी दोन हात केले. मात्र तो एकटाच असल्याने सर्व आरोपींनी त्याच्यावर हल्ला केला. यामध्ये भाऊ देखील गंभीर जखमी झाला आहे. मारहाण केल्यानंतर सर्व आरोपी तेथून फरार झालेत. पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    मराठा आरक्षणात सहा महिन्यांचा दिरंगाई; फक्त ९८ जणांना मिळाले प्रमाणपत्र !

    February 24, 2026

    आदित्य ठाकरेंनी अधिवेशनात सरकारला धरले धारेवर, लाडकी बहीण, प्रदूषण आणि भ्रष्टाचाराचे प्रश्न!

    February 24, 2026

    “अजित पवारांचा अपघात अपघात नाही? रोहित पवारांचा VSR–DGCAवर धक्कादायक आरोप!”

    February 24, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.