Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » निवडणूक आयोग नाराज ‘या’ कारणाने सरकारला दिली नोटीस !
    राजकारण

    निवडणूक आयोग नाराज ‘या’ कारणाने सरकारला दिली नोटीस !

    editor deskBy editor deskMarch 21, 2024No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    नवी दिल्ली : वृत्तसंस्था

    केंद्र सरकारकडून सामान्य लोकांना पाठवण्यात येणारे विकसित भारताचे मेसेज त्वरीत बंद करण्याचे आदेश निवडणूक आयोगाने दिलेत. निवडणूक आयोगाने निवडणूक आयोगाने यासंदर्भात इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाला नोटीसही बजावली आहे.
    व्हॉट्स अ‍ॅपवर पाठवण्यात येणारे ‘विकसित भारत’चे मेसेज त्वरीत बंद करावेत, ते सामान्य लोकांना हे मेसेज पाठवू नये असे आदेश आयोगाने दिलेत. मेसेज पाठवण्याप्रकरणी मंत्रालयाकडून आचार संहिता अनुपालनााच अहवाल मागवण्यात आलाय. सार्वत्रिक निवडणूक २०२४ ची घोषणा आणि आदर्श आचारसंहिता लागू होऊनही नागरिकांच्या फोनवर असे संदेश पाठवले जात असल्याच्या अनेक तक्रारी आयोगाला प्राप्त झाल्या होत्या.

    त्यानंतर निवडणूक आयोगाने मेसेज बंद करण्याचे निर्देश दिलेत. आयोगाच्या निर्देशानंतर आयटी मंत्रालयाने आयोगाला उत्तर दिले आहे. हे मेसेज आचार संहिता लागू करण्यापूर्वी पाठवण्यात आले होते. परंतु त्यातील काही प्रणालीगत आणि नेटवर्क मर्यादांमुळे ते मेसेज सामान्य लोकांना उशिराने पोहेचले असतील असं मंत्रालायकडून सांगण्यात आले आहे.

    गेल्या काही दिवसांपासून अनेक व्हॉट्सॲप युझर्सला ‘विकसित भारत संपर्क’ कडून लोकांकडून फीडबॅक आणि सूचना मागणारे संदेश आलेत. हा संदेश एका PDF सह येतो ज्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे पत्र आहे, ज्यामध्ये प्रधानमंत्री आवास योजना, आयुष्मान भारत, मातृ वंदना योजना इत्यादी सरकारी योजनांचा उल्लेख आहे. आदी सरकारी उपक्रम आणि योजनांबद्दल नागरिकांकडून सूचना मागवल्या आहेत. ‘माझ्या प्रिय कुटुंबातील सदस्य’ असं संबोधित करत हा मेसेज येतो. या पत्राने राजकीय वादाला तोंड फुटले आहे. काँग्रेसने असल्याचं म्हटलंय.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    भाजप प्रदेश माध्यम विभागात मोठा फेरबदल – राज्यभर नव्या प्रवक्त्यांची नियुक्ती जाहीर!

    April 21, 2026

    “डॉलरचे पार्सल” ठरले सापळा; भीती आणि आमिषाने ३.४७ लाखांची ऑनलाईन लूट

    April 21, 2026

    बीडमध्ये धक्कादायक प्रकार; सावत्र मुलासोबत महिला फरार

    April 20, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.