Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » ४१ लाचखोरांना भोवला वरकमाईचा मोह !
    क्राईम

    ४१ लाचखोरांना भोवला वरकमाईचा मोह !

    टीम लाईव्ह महाराष्ट्रBy टीम लाईव्ह महाराष्ट्रJanuary 1, 2022No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    लाचखोरी मध्ये जिल्ह्यात प्रथम क्रमांकावर पोलीस विभाग

    लाईव्ह महाराष्ट्र न्यूज : लाज देणे व घेणे हे कायद्याने गुन्हा असला तरी मोठ्या प्रमाणावर लाज घेतली जाते जळगाव जिल्ह्यातील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गेल्या वर्षभरात केलेल्या कारवाईमध्ये लाच प्रकरणांमध्ये पोलीस विभागातील कर्मचारी सर्वाधिक पकडले गेले आहे त्यानंतर महसूल विभागाचा नंबर लागत आहे ज्यांच्यावर सुरक्षेची मदार आहे तेच लाचखोरी मध्ये तेच लाच खोरी  मध्ये पुढे गेलेले दिसत आहे.

    शासकिय कार्यालयात अनेक योजना असोत वा कर्मचारी अधिकार्‍यांच्या सेवानिवृत्तीसह, कायदे कज्जे, खटले, शेती, उद्योग, सेवा लाभांची प्रकरणे मार्गी लागण्यासाठी अनेकांकडून आर्थीक लाभाची अपेक्षा ठेवून काम करणार्‍या ३३ लाचखोरीची प्रकरणे उघडकीस आणण्यात जळगाव लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकार्‍यांनी आघाडी घेतली आहे. तर ३३ प्रकरणात ४१ अधिकारी कर्मचार्‍यांसह खाजगी इसमांना देखिल वरकमाईचा मोह अनावर झाल्याने लाचलुचपत विभागाने त्यांची गठडी वळवून त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. लाचखोरीत नाशिक विभागात नगर जिल्हयात ३४ तर जळगाव जिल्ह्यात ३३ लाचखोरीची प्रकरणे उघडकीस आली आहेत.

    लाच देणे वा घेणे कायद्यानुसार गुन्हा असूनही जिल्हयात अनेक लोकसेवकांसह खाजगी पंटरांना देखिल पैशांचा मोह आवरता आलेला नाही. वरकमाईची ३३ प्रकरणांची नोंद असून यावर्षी जुलैनंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपअधिक्षक शशिकांत पाटील आणि त्यांच्या सहकार्‍यांनी वेळोवेळी जनप्रबोधन आणि आवाहन केल्यामुळे नागरिकांसह लाचलुचपतच्या अधिकार्‍यांच्या सजगतेमुळे ३३ प्रकरणे उघडकीस आली.

    यात पोलीस विभाग आघाडीवर असून सर्वात जास्त ११ लाचखोरीची प्रकरणे आहेत. यात ११ पोलीस कर्मचार्‍यांसह १ पोलीस पाटील व १ होमगार्डचा समावेश आहे. दुसर्‍या क्रमांकावर जि.प.विभाग असून शिक्षण, बांधकाम, ग्रामपंचायत व पंचायत समिती असे ७ कर्मचारी आहेत. तिसर्‍या क्रमांकावर महसूल मधील २ तलाठी व १ कोतवाल तर सार्वजनिक बंाधकामचे ३ आहे. महावितरणचे ३, नगरपरिषद २, दुय्यम निबंधक विभाग १, जिल्हा उद्योग केंद्र १, महाराष्ट जीवन प्राधीकरण १, न्यायालय १, पाटबंधारे विभाग १ आरटीओ मधील २ खाजगी पंटर, उपजिल्हा रूग्णालयातील दिव्यांग प्रमाणपत्र मिळवून देणारे खाजगी पंटर २, आणि शासनाच्या कंत्राटी सेवेतील डॉक्टर १ असे ४१ लाचखोरांना जेरबंद करण्यात आले आहे.
    गेल्या पाच वर्षाचा आलेख पहाता २०१६ मध्ये सर्वात जास्त ४०, २०१७-२६, २०१८-३०, २०१९-३१, २०२०-२० तर २०२१ मध्ये हा आलेख पुन्हा वाढला असून तब्बल ३३ गुन्हे उघडकीस आली यात अभियंता, ग्रामसेवक, विस्तार अधिकारी, जि.प.शिक्षण, बांधकाम, नगरपरिषद मुख्याधिकारी, वा अन्य असे श्रेणी २ व ३ चे अधिकारी कर्मचार्‍यांसह खाजगी इसम असे ४१ लाचखोरांवर संक्रांत आली आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    टीम लाईव्ह महाराष्ट्र
    • Website

    Related Posts

    सर्वांसमोर झालेला अपमान जीवावर बेतला; २० वर्षीय विद्यार्थ्याच्या मृत्यूने जळगाव हळहळले

    February 17, 2026

    शेतात पाणी भरण्यास निघालेल्या तरुणाचा भीषण अपघातात मृत्यू

    February 16, 2026

    दारूच्या नशेत वाद, तरुणाचा निर्घृण खून; अल्पवयीनसह दोघे ताब्यात

    February 16, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.