Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » ठाकरे गटाला धक्का देत आमदार शिंदेंच्या सेनेत दाखल !
    राजकारण

    ठाकरे गटाला धक्का देत आमदार शिंदेंच्या सेनेत दाखल !

    editor deskBy editor deskMarch 18, 2024No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    मुंबई : वृत्तसंस्था

    राज्यातील ठाकरे गटाला गेल्या काही महिन्यापासून अनेक धक्के बसत असतांना आता पुन्हा खानदेशातून एका आमदाराने शिंदे गटात प्रवेश केला आहे. नंदुरबारमधील ठाकरे गटाचे विधान परिषदेतील आमदार आमश्या पाडवी यांनी – रविवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्त्वाखालील शिवसेनेत प्रवेश केला. ठाकरे गटाचे कल्याणचे जिल्हाप्रमुख चंद्रकांत बोडारे यांनीही शनिवारी शिवसेनेला ‘जय महाराष्ट्र’ करत शिंदे गटात जाणे पसंत केले होते. ठाकरे गटातून शिंदे गटात ‘ऑऊटगोईंग’ सुरुच असून, बुधवारपर्यंत आणखी काही नेते शिंदे गटात येतील, असा दावा आमदार संजय शिरसाट यांनी केला आहे.

    मुख्यमंत्री शिंदे यांच्या उपस्थितीत रविवारी मुंबईत आमश्या पाडवी यांनी आपल्या काही कार्यकर्त्यांसह शिंदे गटात प्रवेश केला. नंदुरबार जिल्ह्यातील दुर्गम भागातील शिवसेनेचा महत्त्वाचा चेहरा म्हणून पाडवी यांची ओळख आहे. गेल्या अनेक वर्षांपासून ते शिवसेनेत काम करत आहेत. २०१४ आणि २०१९ मध्ये काँग्रेस नेते के. सी. पाडवी यांच्याविरोधात त्यांनी विधानसभा निवडणूक लढवली होती. आता नंदुरबारमध्ये पाडवी लोकसभेसाठी पुन्हा एकदा मैदानात असण्याची शक्यता होती. शिवसेना ठाकरे गट आणि काँग्रेस याची आघाडी असल्यामुळे आमश्या पाडवी यांना काँग्रेस उमेदवाराचा प्रचार करावा लागला असता.

    त्यामुळे आगामी विधानसभेची निवडणूक लक्षात घेऊन आमश्या पाडवी यांनी शिवसेनेच्या शिंदे गटात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला. सन २०२२ मध्ये झालेल्या विधान परिषद निवडणुकीत उद्धव ठाकरे यांनी बड्या नेत्यांची नाराजी ओढवून घेत पाडवींना उमेदवारी दिली होती, असे असले तरी आमश्या पाडवींनी शिंदे गटात जाणे पसंत केले.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    मराठा आरक्षणात सहा महिन्यांचा दिरंगाई; फक्त ९८ जणांना मिळाले प्रमाणपत्र !

    February 24, 2026

    आदित्य ठाकरेंनी अधिवेशनात सरकारला धरले धारेवर, लाडकी बहीण, प्रदूषण आणि भ्रष्टाचाराचे प्रश्न!

    February 24, 2026

    “अजित पवारांचा अपघात अपघात नाही? रोहित पवारांचा VSR–DGCAवर धक्कादायक आरोप!”

    February 24, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.