Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » धक्कादायक : पतीच्या मारहाणीत पत्नीचा मृत्यू
    क्राईम

    धक्कादायक : पतीच्या मारहाणीत पत्नीचा मृत्यू

    editor deskBy editor deskMarch 15, 2024No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    नाशिक : वृत्तसंस्था

    राज्यातील गुन्हेगारी मोठ्या प्रमाणात वाढत असतांना नुकतेच नाशिक शहरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. पतीसोबत झालेल्या भांडणात पत्नीला मारहाण झाली. या मारहाणीत पत्नीचा मृत्यू झाला आहे. सदर घटनेबाबत पोलिसांनी आरोपी पतीला ताब्यात घेतलं असून त्याची कसून चौकशी सुरू आहे. विवाहीत महिलेच्या हत्येने सध्या परिसरात खळबळजनक वातावरण पसरलं आहे.
    मिळालेल्या अधिक महितीनुसार, नाशिकच्या तामसवाडी निफाड येथे ही हृदयद्रावक घटना घडली आहे. एक विवाहीत जोडपं येथे राहत होतं. महिलेचा पती कायम दारूच्या नशेत असायचा. पती सतत दारू पित असल्याने पत्नीचे आणि त्याचे नेहमी भांडण व्हायचे. काल देखील या दोघांमध्ये अशीच जोरदार भांडणे झाली.

    ही भांडणे इतकी विकोपाला गेली की, पतीने आपल्याच पत्नीला बेदम मारहाण केली. या मारहाणीत तिचं डोकं भिंतीवर आपटलं गेलं. यावेळी तिचा भाऊ देखील घरात होता. बहिणीला होणारा त्रास त्याला बघवला नाही. त्याने दोघांमध्ये पडून भांडण सोडवण्याचा प्रयत्न केला. मात्र पतीने पत्नीच्या भावाला देखील मारहाण केली. यामध्ये तो गंभीर जखमी झाला.

    पत्नीचं डोकं भिंतीव आदळल्यानंतर पत्नीच्या डोक्यातून रक्त येऊ लागलं. रागात आपल्याकडून मोठी चूक झाल्याचं त्याच्या लक्षात आलं. त्यानंतर त्याने पत्नीला जिल्हा रुग्णालयात दाखल केले. डॉक्टरांनी महिलेला तपासून मृत घोषित केलं. माझी पत्नी पाय घसरून पडली आहे, असं पतीने डॉक्टरांना सांगितलं होतं.मात्र ही हत्या असल्याचं डॉक्टरांच्या लगेचच लक्षात आलं. डॉक्टर आणि जिल्हा रुग्णलाय पोलीस चौकीवर असलेले पोलिस कॉन्स्टेबल शरद पवार यांना संशय आल्याने त्यांनी पतीची चौकशी केली. त्यावेळी पतीने आपण केलेल्या गुन्ह्याची कबुली दिली. पत्नीचा खून मीच केला असल्याची पतीने पोलिसांना कबुली दिली आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    मराठा आरक्षणात सहा महिन्यांचा दिरंगाई; फक्त ९८ जणांना मिळाले प्रमाणपत्र !

    February 24, 2026

    आदित्य ठाकरेंनी अधिवेशनात सरकारला धरले धारेवर, लाडकी बहीण, प्रदूषण आणि भ्रष्टाचाराचे प्रश्न!

    February 24, 2026

    “अजित पवारांचा अपघात अपघात नाही? रोहित पवारांचा VSR–DGCAवर धक्कादायक आरोप!”

    February 24, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.