Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » पवारांनी दिला आ.शेळके यांना सज्जड दम
    राजकारण

    पवारांनी दिला आ.शेळके यांना सज्जड दम

    editor deskBy editor deskMarch 7, 2024No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    पुणे : वृत्तसंस्था

    राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातर्फे मावळ तालुका कार्यकर्ता संवाद मेळावा आज लोणावळ्यात पार पडतोय. या मेळाव्याला पक्षाचे अध्यक्ष शरद पवार उपस्थित आहेत. यावेळी कार्यक्रमात बोलताना शरद पवार यांनी राष्ट्रवादी अजित पवार गटाचे मावळचे आमदार सुनील शेळके यांना थेट इशारा देत मलाही शरद पवार म्हणतात, अशा शब्दात सज्जड दम दिला. नेमकं काय म्हणाले शरद पवार,

    “देशाचे गृहमंत्री आपल्या राज्यात आले होते. मुंबईतील भाषणात सांगितलं की पन्नास वर्षे शरद पवार बसलेत. मी त्यांचा आभारी आहे, पन्नास वर्षे जनतेने माझ्यावर विश्वास ठेवला, हे अमित शाह यांनी मान्य केलं,असा टोला शरद पवार यांनी लगावला. तसेच गेली दहा वर्षे मोदी सत्तेत आहेत, उत्पन्न वाढलं का? उलट शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढल्या. शेतकऱ्यांवर आत्महत्या करण्याची वेळ आणली, हीच मोदींनी गॅरंटी दिली,”” अशा शब्दात शरद पवार यांनी पंतप्रधान मोदींवरही हल्लाबोल केला.

    “मला असं समजलं तुम्ही पदाधिकारी आणि कार्यकर्ते इथं येताय म्हणून तुम्हाला धमकी दिली जात आहे. मी त्यांना सांगू इच्छितो. सुनील शेळके तुम्ही आमदार कोणामुळे झाला, तुझ्या सभेला कोण आलं होतं. पक्षाचा अध्यक्ष कोण होतं? तुझ्या त्या अर्जावर माझी सही आहे. हे लक्षात ठेवा. यापुढं असं काही केलं तर मला शरद पवार म्हणतात, हे विसरू नका. मी त्या वाटेने जात नाही, पण गेलो तर मी कोणाला सोडत नाही…” असा थेट इशारा शरद पवार यांनी दिला.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    ‘दर्पण’कार बाळशास्त्री जांभेकर यांना जळगावमध्ये अभिवादन

    February 21, 2026

    गच्चीवर मंडप, तिथेच दहावीची परीक्षा; बीडमधील धक्कादायक नियोजनशून्यता

    February 21, 2026

    ‘जमीन घेण्यापेक्षा गोळ्या घाला’ : सरकारला शेतकऱ्यांचा संतप्त इशारा

    February 20, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.