Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » एमडी ड्रग्ज न सापडता गुटखा मिळाला
    क्राईम

    एमडी ड्रग्ज न सापडता गुटखा मिळाला

    editor deskBy editor deskMarch 3, 2024No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव : प्रतिनिधी

    नशेतील एका तरुणाने सांगितल्याप्रमाणे पोलिस पथक त्याच्या घरी एमडी ड्रग्ज शोधायला गेले खरे; मात्र त्याच्या घरात प्रतिबंधित गुटखा आढळून आला. शहर पोलिसांनी ७४ हजार १४९ रुपयांचा गुटखा व इतर मुद्देमाल जप्त केला.

    मिळालेल्या माहितीनुसार, जळगाव शहरात १ मार्च रोजी पोहेकॉ किशोर निकुंभ व पोकों तेजस मराठे हे पेट्रोलिंग करत असताना शाहूनगर परिसरात अयान हसन भिस्ती (२०, रा. शाहूनगर) हा नशेत असल्याचे आढळून आले. त्याने एमडी ड्रग्जची नशा केली असून, ते घरात ठेवले असल्याचे पोलिसांना सांगितले. पोलिस त्याच्या घरी गेले असता, तेथे त्याचा भाऊ अन्सार हसन भिस्ती (२२) होता. घर झडतीत एमडी ड्रग्ज न सापडता प्रतिबंधित गुटखा मिळाला, गुटख्याच्या या साठ्यासह ३२ हजार २७० रुपये, दोन मोबाइल, असा एकूण ७४ हजार १४९ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याप्रकरणी पोकों तेजस मराठे यांनी शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून अयान भिस्ती व अन्सार भिस्ती या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात येऊन दोघांना अटक करण्यात आले आहे. पुढील तपास सपोनि कल्याणी वर्मा करीत आहेत.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    जिल्ह्यात अवैध गौणखनिज उत्खननाविरोधात महसूल विभागाची धडक कारवाई

    March 3, 2026

    मध्यपूर्वेत युद्धज्वाला; दुबई विमानतळ ठप्प, प्रवाशांचा थरारक अनुभव

    March 3, 2026

    भाचीच्या लग्नातील दागिन्यांवर भाच्याचाच डल्ला; तिघांना अटक

    March 3, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.