Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » भीषण अपघात : १४ ठार तर २१ गंभीर जखमी !
    क्राईम

    भीषण अपघात : १४ ठार तर २१ गंभीर जखमी !

    editor deskBy editor deskFebruary 29, 2024No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    दिंडोरी : वृत्तसंस्था

    आज पहाटे मध्य प्रदेशच्या दिंडोरी येथे पिकअप गाडी उलटून 14 जणांचा मृत्यू झाला. तर 20 जण जखमी झाले आहेत. सर्व जखमींना सामुदायिक आरोग्य केंद्र शाहपुरा येथे दाखल करण्यात आले आहे. गाडीत सुमारे 45 जण होते. बिचिया पोलीस ठाण्याच्या हद्दीत गुरुवारी पहाटे 3 ते 4 च्या दरम्यान हा अपघात झाला. मृतांमध्ये 6 पुरुष आणि 8 महिलांचा समावेश आहे. सर्वांचे वय 16 ते 60 वर्षे दरम्यान आहे.

    पिकअप मालक अजमेर टेकम याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. अपघाताच्या वेळी अजमेर हा वाहन चालवत होता. अतिरिक्त पोलिस अधीक्षक जगन्नाथ मरकाम यांनी दिलेल्या माहितीनुसार, गावकरी अमाही देवरी गावातून मंडला जिल्ह्यातील मसूर घुगरी गावाच्या चौकात कार्यक्रमासाठी गेले होते. परत येत असताना MP20 GB4146 पिकअप नियंत्रणाबाहेर जाऊन पलटी होऊन 20 फूट खाली शेतात कोसळला. वाहनाचा विमा आणि फिटनेस कालबाह्य झाला होता.

    परिवहन विभागाच्या वेबसाइटवर पिकअपचा विमा फक्त ऑगस्ट 2021 पर्यंत उपलब्ध होता. सप्टेंबर 2022 मध्ये फिटनेसची मुदत संपली होती. घटनेची माहिती मिळताच जिल्हाधिकारी विकास मिश्रा आणि एसपी अखिल पटेल शाहपुरा रुग्णालयात पोहोचले. जिल्हाधिकाऱ्यांनी दिंडोरी आरटीओलाही बोलावले आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    कर्जत घाटवर भीषण अपघात; ट्रकच्या धडकेत चालकाचा मृत्यू, बसमधील प्रवासी जखमी

    February 24, 2026

    महामार्गावर भीषण अपघात; भरधाव ट्रकच्या धडकेत मजूर ठार, एक गंभीर !

    February 24, 2026

    वेळ संपल्याने बँड बंद; पुन्हा वाजविण्यास नकार दिल्याने बँडमालकावर हल्ला !

    February 24, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.