Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » नात्याला काळीमा फासणारी घटना ; काकाने अपहरण करून 11 वर्षे लुटली अब्रू
    क्राईम

    नात्याला काळीमा फासणारी घटना ; काकाने अपहरण करून 11 वर्षे लुटली अब्रू

    टीम लाईव्ह महाराष्ट्रBy टीम लाईव्ह महाराष्ट्रDecember 28, 2021No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email



    आरोपी काका हा मागील 11 वर्षांपासून पिडीतेला बंधक बनवून तिच्यावर सतत बलात्कार करत होता. विरोध केल्यावर तो तिला बेदम मारहाण करायचा आणि खोलीत कोंडून अनेक दिवस उपाशी ठेवायचा. आरोपीला आता तिच्याशी जबरदस्तीने लग्न करायचे आहे.

    उत्तर प्रदेशात नात्याला काळीमा, काकाने युवतीचे अपहरण करून 11 वर्षे लुटली अब्रू

    लाईव्ह महाराष्ट्र न्यूज : लखनऊ मध्ये गुन्हेगारी वाढलेल्या उत्तर प्रदेशात महिलांच्या सुरक्षेला धक्का देणारी आणि नात्याला काळीमा फासणारी आणखी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. सख्ख्या मावशीच्या पतीने भाचीचे अपहरण करून तिला 11 वर्षे आपल्या घरी डांबून ठेवले. त्यानंतर मागील 11 वर्षे तिची अब्रू लुटल्याची घटना घडली आहे. मावस काकाच्या अतिरेकी कृत्याने परिसरात प्रचंड खळबळ उडाली आहे. गाझियाबाद जिल्ह्यातील मुरादनगर पोलीस स्टेशन हद्दीत ही घटना घडली असून पोलिसांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन वेगाने तपासाची चक्रे फिरवली आहेत.

    अति दुर्गम भागात घडली घटना

    मुरादनगर पोलीस स्टेशनच्या हद्दीत दुर्गम भागात घडलेल्या या घटनेने नातेसंबंधही किती असुरक्षित बनले आहेत याची प्रचिती समोर आली आहे. मुरादनगरपासून काही अंतरावर असलेल्या गावात एका अल्पवयीन मुलीचे तिच्या मावस काकाने अपहरण केले. त्यानंतर 11 वर्षांपासून तिच्यावर अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याबाबत पिडीत मुलीने रविवारी पोलिस ठाण्यात धाव घेऊन पोलिसांत तक्रार दिली. त्यानंतर तिच्यावरील अन्याय-अत्याचाराला वाचा फुटली आहे. पिडीत तरुणीने आरोपी काकाच्या मुसक्या आवळून त्याच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. पिडीतेने पोलिसांत दिलेल्या तक्रारीच्या वृत्ताला स्टेशन प्रभारी सतीश कुमार यांनी दुजोरा दिला आहे. पिडीतेने सांगितले की, 11 वर्षांपूर्वी ती चारा घेण्यासाठी शेतात गेली होती, तेव्हा तिच्या मावशीने तिचे अपहरण केले होते.


    अत्याचाराला विरोध केल्यास करायचा मारहाण
    आरोपी काका हा मागील 11 वर्षांपासून पिडीतेला बंधक बनवून तिच्यावर सतत बलात्कार करत होता. विरोध केल्यावर तो तिला बेदम मारहाण करायचा आणि खोलीत कोंडून अनेक दिवस उपाशी ठेवायचा. आरोपीला आता तिच्याशी जबरदस्तीने लग्न करायचे आहे. यासाठी त्याने तिच्याशी लग्न न केल्यास चेहऱ्यावर अॅसिड टाकण्याची धमकीही दिली आहे. तसेच लग्नाला नकार दिल्यास त्याचे आणखी गंभीर परिणाम भोगावे लागतील, असेही त्याने धमकावले. पिडीतेने आरोपीच्या तावडीतून स्वतःची कशीतरी सुटका करून घेतली आणि तेथून दिल्लीला गेली. त्यानंतर पिडीतेला तिचा खरा भाऊ दिल्लीत सापडला. भावाने बहिणीला ओळखले. यानंतर मुलीने तिचा मावस काकाकडून झालेला प्रचंड त्रास कुटुंबीयांना सांगितला आणि त्यानंतरच ती तक्रार देण्यासाठी पोलीस ठाण्यात आली.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    टीम लाईव्ह महाराष्ट्र
    • Website

    Related Posts

    सर्वांसमोर झालेला अपमान जीवावर बेतला; २० वर्षीय विद्यार्थ्याच्या मृत्यूने जळगाव हळहळले

    February 17, 2026

    अजित पवार विमान दुर्घटना; घातपाताचा संशय, रोहित पवारांची स्वतंत्र चौकशी

    February 16, 2026

    संविधान धोक्यात; टिपू सुलतान मुद्द्यावर भाजपची राजकीय सोय : हर्षवर्धन सपकाळांचा हल्लाबोल

    February 16, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.