Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » १५ हजारांची लाच भोवली : विद्युत निरीक्षक अटकेत
    क्राईम

    १५ हजारांची लाच भोवली : विद्युत निरीक्षक अटकेत

    editor deskBy editor deskFebruary 28, 2024No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव मिरर | २८ फेब्रुवारी २०२४

    विद्युत कामे करणाऱ्या परवानाधारक कंत्राटदाराकडून परवाना नूतनीकरणासाठी १५ हजार रुपयांची लाच घेताना खाते उद्योग, ऊर्जा व कामगार विभागाचा विद्युत निरीक्षक गणेश नागो सुरळकर (५२, रा. पार्वती नगर) याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मंगळवारी रंगेहाथ पकडले.

    मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदार परवानाधारक कंत्राटदार असून ते शासकीय विद्युतीकरणाचे कामे घेतात. परवान्याचे नुतनीकरणासाठी त्यांनी खाते उद्योग, ऊर्जा व कामगार विभागाचा विद्युत निरीक्षक गणेश सुरळकर याच्याकडे अर्ज केला होता. त्यासाठी सुरळकर याने १५ हजार रुपयांची मागणी केली. तक्रारदाराने याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. त्यानुसार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस निरीक्षक अमोल वालझडे, एन. एन. वाघ दिनेशसिंह पाटील, सुरेश पाटील, प्रदीप पोळ, राकेश दुसाने, प्रणेश ठाकूर, रवींद्र घुगे, शैला धनगर, किशोर महाजन, सुनील वानखेडे, बाळू मराठे, अमोल सुर्यवंशी या पथकाने सापळा रचून तक्रारदाराकडून १५ हजारांची लाच घेताना रंगेहाथ पकडले. याप्रकरणी गणेश सुरळकर यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    जिल्ह्यात अवैध गौणखनिज उत्खननाविरोधात महसूल विभागाची धडक कारवाई

    March 3, 2026

    मध्यपूर्वेत युद्धज्वाला; दुबई विमानतळ ठप्प, प्रवाशांचा थरारक अनुभव

    March 3, 2026

    भाचीच्या लग्नातील दागिन्यांवर भाच्याचाच डल्ला; तिघांना अटक

    March 3, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.