Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » घरी बोलवून तरुणीचा विनयभंग
    क्राईम

    घरी बोलवून तरुणीचा विनयभंग

    editor deskBy editor deskFebruary 27, 2024No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    पुणे : वृत्तसंस्था

    राज्यातील अनेक शहरात अल्पवयीन मुलीसह विवाहितेवर अत्याचार व विनयभंगाच्या अनेक घटना घडत असताना अशीच एक धक्कादायक घटना पुणे शहरात घडली आहे. व्यावसायासंदर्भात चर्चा करण्यासाठी तरुणीला घरी बोलावून घेत तिच्यासोबत अश्लील चाळे करुन तिचा विनयभंग केला. याप्रकरणी विश्रांतवाडी पोलिसांनी एका युवकावर विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार 12 फेब्रुवारी रोजी रात्री अकराच्या सुमारास धानोरी येथील मुंजाबावस्ती येथे आरोपीच्या घरी घडला आहे.

    याबाबत विमाननगर येथे राहणाऱ्या 20 वर्षीय तरुणीने रविवारी (दि.25) विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. यावरुन प्रविण चिजवाणी (वय-35 रा. गोल्डकोस्ट सोसायटी, मुंजाबावस्ती, धानोरी) याच्या विरोधात आयपीसी 354 नुसार गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी आणि फिर्यादी एकमेकांच्या ओळखीचे आहेत. आरोपी प्रविण याने पीडित तरुणीला बिझनेस संदर्भात चर्चा करण्यासाठी घरी बोलावून घेतले.

    पीडित मुलगी आरोपीच्या घरी चर्चा करण्यासाठी गेली. चर्चा करत असताना आरोपीने तरुणीचा हात पकडून तिच्यासोबत अश्लील चाळे करुन स्त्री मनास लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन केल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक महेश चव्हाण करीत आहेत.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    होळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे; काहींना चार हजार रुपयांचा लाभ

    February 5, 2026

    भरसभेतच उलट आदेश : “धनुष्यबाणाच्या उमेदवाराला मत नको” – शिंदेंच्या वक्तव्याने खळबळ

    February 5, 2026

    विश्वासघात हा उबाठा–राऊतांचा डीएनए”; नवनाथ बन यांचा जोरदार हल्लाबोल

    February 5, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.