Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » दोन मुलींना चौथ्या मजल्यावरून फेकून स्वतः घेतली महिलेने उडी
    क्राईम

    दोन मुलींना चौथ्या मजल्यावरून फेकून स्वतः घेतली महिलेने उडी

    editor deskBy editor deskFebruary 22, 2024No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    नवी दिल्ली : वृत्तसंस्था

    नोएडातील बरौला गावात शिव मंदिराजवळ राहणाऱ्या एका महिलेने आपल्या दोन मुलींना चौथ्या मजल्यावरून फेकून दिले. यानंतर महिलेने स्वत:ही उडी मारून आत्महत्या केली. यात एका मुलीचा जागीच मृत्यू झाला तर महिला सरिता आणि तिची एक मुलगी गंभीर जखमी झाली. या दोघांवर प्रयाग हॉस्पिटलच्या आयसीयूमध्ये उपचार सुरू होते. आता या महिलेचाही उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची बातमी समोर येत आहे.

    सविस्तर वृत्त असे कि, बरौला गावात तीन वर्षांपासून भाड्याच्या घरात राहणारी 32 वर्षीय सरिता ही महिला तिचा नवरा मनोज प्रयाग हॉस्पिटलच्या कॅन्टीनमध्ये काम करतो. सकाळी साडेनऊच्या सुमारास मनोज घरातून जेवण करून कॅन्टीनमध्ये गेला. अवघ्या 10 ते 20 मिनिटांनी शेजाऱ्यांनी मनोजला फोन करून घटनेची माहिती दिली. सरिता आपल्या दोन मुलींसह घराच्या छतावरून खाली पडल्याची माहिती शेजाऱ्यांनी दिली. महिलेला चार मुली होत्या, एक तिच्या मोठ्या बहिणीला दिली.

    या घटनेत सरिता आणि तिची ५ वर्षांची मुलगी कृतिका यांचा मृत्यू झाला तर ३ वर्षांच्या दिव्यावर उपचार सुरू आहेत. मनोजला आणखी एक 7 वर्षांची मुलगी आहे, जी घटनेच्या वेळी शाळेत होती. या महिलेला चार मुली होत्या, त्यापैकी एक तिने तिच्या मोठ्या बहिणीला दिल्याचे सांगण्यात आले. मनोज कामावर निघून गेल्यावर सरिताने प्रथम तिची तीन वर्षांची मुलगी दिव्या हिला चौथ्या मजल्यावरून खाली फेकले आणि नंतर पाच वर्षांच्या कृतिका हिला खाली फेकले. त्यानंतर तिने स्वतः चौथ्या मजल्यावरून खाली उडी मारली. आर्थिक विवंचनेतून महिलेने हे पाऊल उचलल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. मात्र, पोलीस या प्रकरणाचा प्रत्येक बाजूने तपास करत आहेत.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    महसूल विभागात खळबळ : पाच हजाराची लाच घेताना तलाठी अटकेत

    March 26, 2026

    राज्यात मार्चच्या शेवटी उष्णतेतून अवकाळी पावसाकडे – हवामान विभागाचा ‘यलो अलर्ट’ !

    March 26, 2026

    ‘गुपितं उघड करावी लागतील’ म्हणत राजकारणात खळबळ ;तटकरे यांचा रोहित पवारांना इशारा !

    March 26, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.