Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » ट्रकवरून पडल्याने चालकाचा जागीच मृत्यू
    क्राईम

    ट्रकवरून पडल्याने चालकाचा जागीच मृत्यू

    editor deskBy editor deskFebruary 20, 2024No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    भुसावळ : प्रतिनिधी

    तालुक्यातील यावल शहराजवळ चोपडा रस्त्यावर ट्रकवर ताडपत्रीचा दोर बांधताना तोल जाऊन पडल्याने चालक जागीच ठार झाला. ही दुर्घटना रविवारी रात्री नऊ वाजता घडली. घटनेची माहिती मिळताच पोलिस पथक घटनास्थळी दाखल झाले. मयत चालकाचा मृतदेह यावल ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आला, मयताचे नाव संतोष रामसिंग भूरिया असे आहे. तो मध्य प्रदेशातील इंदूर येथील रहिवासी आहे. त्याच्या कुटुंबीयांना माहिती देण्यात आली आहे.

    यावल शहराबाहेर चोपडा रस्त्यावर महाजन पेट्रोल पंपाजवळ संतोष हा ट्रकवरील ताडपत्रीला दोर बांधत असताना त्याचा तोल गेला. रस्त्यावर कोसळून त्याच्या डोक्याला जबर दुखापत होऊन तो जागीच ठार झाला. या दुर्घटनेची माहिती आरडाओरड करून ट्रक वरील क्लीनर उपेंद्र राजकुमार चव्हाण याने नागरिकांना दिली. घटनास्थळी अयाज खान, इम्तियाज शेख आदींसह नागरिक दाखल झाले व त्यांनी पोलिसांना माहिती दिली.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    १३ वर्षांपासून कोमात, गाझियाबादच्या तरुणाला सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक इच्छामृत्यू निर्णय

    March 11, 2026

    जेवणासाठी उतरले… अन् एसटी बस पेटली : ५० प्रवासी थोडक्यात बचावले

    March 11, 2026

    दक्षता पेट्रोलपंप घोटाळा : उपनिरीक्षक वाघांकडून मुलाच्या खात्यात 10 लाख; सोन्याची खरेदी उघड

    March 11, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.