Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » ठाकरे गटाने जाहीर केली लोकसभा निवडणूक समन्वयक यादी
    राजकारण

    ठाकरे गटाने जाहीर केली लोकसभा निवडणूक समन्वयक यादी

    editor deskBy editor deskFebruary 19, 2024No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    मुंबई : वृत्तसंस्था

    देशातील सर्वच पक्षांनी आगामी लोकसभा निवडणुकीसाठी मोठी तयारी सुरु केली असतांना आता लवकरच लोकसभा निवडणुकांचं रणशिंग फुंकलं जाणार आहे. या निवडणुकीत जास्तीत जास्त जागांवर विजय मिळवण्यासाठी सर्वच पक्ष कामाला लागलेत. अशात शिवसेना ठाकरे गटाने लोकसभा निवडणूक समन्वयक यादी जाहीर केली आहे. यावेळी अनेक नवख्या चेहऱ्यांना संधी देण्यात आलीये.
    मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबद्दल आक्षेपार्य वक्तव्य केल्याने अटक करण्यात आलेले मुंबईचे माजी महापौर आणि ठाकरे गटाचे उपनेते दत्ता दळवी यांचेही नाव समन्वयक यादीत आहे. दत्ता दळवी यांच्यावर ईशान्य मुंबई लोकसभा मतदार संघाची जबाबदारी देण्यात आलीये.

    तर आमदार विलास पोतनीस यांच्यावर मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदार संघाची जबाबदारी देण्यात आली आहे. यासह माजी आमदार संजय कदम यांच्यावर रायगड लोकसभा मतदार संघाची जबाबदारी देण्यात आलीये.

    लोकसभा निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेने मोर्चेबांधणीला सुरू केली आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने लोकसभा निवडणूक समन्वयकांच्या नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या आहेत.

    लोकसभा समन्वयक पुढीलप्रमाणे
    जळगाव : सुनील छबुलाल पाटील
    बुलढाणा : राहुल चव्हाण
    रामटेक : प्रकाश वाघ,
    यवतमाळ : वाशीम – उद्धव कदम
    हिंगोली : संजय कच्छवे
    परभणी : शिवाजी चोथे, संतोष सांबरे
    जालना : राजू पाटील
    संभाजीनगर : प्रदीपकुमार खोपडे
    नाशिक : सुरेश राणे
    ठाणे : किशोर पोतदार, सुभाष म्हसकर
    मुंबई उत्तर पश्चिम : विलास पोतनीस
    मुंबई उत्तर पूर्व ( ईशान्य) : दत्ता दळवी
    मुंबई दक्षिण मध्य : रवींद्र मिर्लेकर
    मुंबई दक्षिण : सुधीर साळवी, सत्यवान उभे
    रायगड : संजय कदम
    मावळ : केसरीनाथ पाटील
    धाराशीव : स्वप्नील कुंजीर
    कोल्हापूर : सुनील वामन पाटील.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    राजकीय वजन वाढवण्याची शिकवण, भावनिक आठवणींचा धगधगता प्रवास ; रोहित पवार !

    February 23, 2026

    रुग्णालयात पाच दिवसाच्या नवजात मुलीला सोडून आई फरार !

    February 23, 2026

    चेन्नईच्या समुद्रात जळगावचा जय बेपत्ता; कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर

    February 23, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.