Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » मालवाहूच्या धडकेत आरोग्य कर्मचारी जागीच ठार
    क्राईम

    मालवाहूच्या धडकेत आरोग्य कर्मचारी जागीच ठार

    editor deskBy editor deskFebruary 17, 2024No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    चोपडा : प्रतिनिधी

    शहरापासून जवळ असलेल्या गोरगावले बुद्रुक येथे दुचाकीवरून परत जाणारे आरोग्य कर्मचारी धर्मेंद्र विजय महाजन (५६) यांना मालवाहू वाहनाने धडक दिली. या अपघातात दुचाकीस्वार धर्मेंद्र महाजन यांचा जागीच मृत्यू झाला. ही घटना शुक्रवारी दुपारी १ वाजता खडगाव जवळ घडली.

    मिळालेल्या माहितीनुसार, चोपडा येथून शासकीय कामे आटोपून परत गोरगावले प्राथमिक आरोग्य केंद्रात धर्मेंद्र महाजन हे जात होते. त्यावेळी हा अपघात झाला. मालवाहू वाहन ( क्रमांक एमएच १९-सीवाय ४८९८) याचा धक्का महाजन यांच्या दुचाकीला लागला. याबाबत जितेंद्र विजय महाजन (रा. चहार्डी, ता. चोपडा) यांच्या फिर्यादीवरून ग्रामीण पोलिस स्टेशनला मालवाहू वाहनाचा चालक जालिंदर मंगल पाटील (वय २९, रा. विरवाडे, ता. चोपडा) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक शेषराव नितनवरे करीत आहेत.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    तरुणाच्या खून प्रकरणातील एकाला अटक ; पारोळा पोलिसांची कारवाई !

    September 12, 2026

    गिरणेच्या वाळूची चोरटी वाहतूक; जळगावात दोन ठिकाणी पोलिसांची धडक कारवाई

    September 12, 2026

    वडिलांना नवीन घर घेतले मुलाने काही दिवसात त्याच घरात घेतला टोकाचा निर्णय !

    September 12, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.