Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » अल्पवयीन मुलीवर अत्याचार : दहा वर्षे सक्तमजुरीची शिक्षा
    क्राईम

    अल्पवयीन मुलीवर अत्याचार : दहा वर्षे सक्तमजुरीची शिक्षा

    editor deskBy editor deskFebruary 3, 2024No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    भुसावळ : प्रतिनिधी

    तालुक्यातील एका गावातील अल्पवयीन मुलीला पळवून नेऊन तिच्यावर अत्याचार केल्याप्रकरणी आरोपी कृष्णा महादेव गोरे (वय २५) रा. कुसुंबा, ता. जळगाव याला जिल्हा न्यायालयाने दहा वर्षे सक्तमजुरी आणि दंडाची शिक्षा ठोठावली आहे.

    आरोपी गोरे याने त्याचा मित्र अनुप मांडवे याच्या मदतीने दि. १० जून, २०२१ रोजी पीडितेला पळवून नेल्याचा आरोप होता. त्यानंतर, अत्याचारातून ती गर्भवती राहिली होती. या प्रकरणात भुसावळ तालुका पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता. यात सरकार पक्षातर्फे १५ साक्षीदार तपासण्यात आले. यात भुसावळ येथील विशेष जिल्हा न्यायधीश व्ही.सी. बर्डे यांनी कृष्णा गोरे याला १० वर्षे सक्तमजुरी आणि दंड ठोठावला आहे, तर अनुप जितेंद्र मांडवे (वय २५) याला या गुन्ह्यातून निर्दोष सोडले आहे.

    याप्रकरणी सरकार पक्षातर्फे सहायक सरकारी वकील अॅड. प्रवीण पी. भोंबे यांनी काम पाहिले, तर पैरवी अधिकारी म्हणून पोलिस उपनिरीक्षक भीमदास बी. हिरे आणि पो.हे.कॉ. आत्माराम भालेराव यांनी मदत केली. या प्रकरणाचा तपास सहायक पोलिस निरीक्षक अमोल पवार, सपोनि रुपाली चव्हाण, पोहेकॉ युनुस शेख, दीपक जाधव, प्रेमचंद सपकाळे, उमेश बारी, राणी परदेशी, सादिक शेख यांनी तपास केला होता.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    रस्त्यावर वेगाचा कहर; जोरदार धडकेत ४९ वर्षीय व्यक्तीचा दुर्दैवी अंत

    April 26, 2026

    भरवस्तीतून ३.११ लाखांचा गॅस माल गायब; चोरट्यांचा प्लॅनबद्ध डाव उघड

    April 26, 2026

    चुलत भावानेच घरात घुसून केला १० वर्षीय बालिकेचा विनयभंग !

    April 26, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.