Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » ठाकरे गटाच्या युवासेना प्रमुखाची निर्घृण हत्या
    क्राईम

    ठाकरे गटाच्या युवासेना प्रमुखाची निर्घृण हत्या

    editor deskBy editor deskJanuary 27, 2024No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    चंद्रपूर : वृत्तसंस्था

    ठाकरे गटाच्या युवासेना शहर प्रमुखाची निर्घृण हत्या झाल्याची धक्कादायक घटना चंद्रपुरातील सरकारनगर परिसरमधून समोर आली आहे. अज्ञातांनी युवासेना शहर प्रमुख शिवा वझरकर याची हत्या करण्यात आली आहे. 30 वर्षीय शिवा वझरकर याचा मृतदेह त्यांच्याच एका मित्राच्या कार्यालयाजवळच आढळल्याने परिसरात खळबळ उडाली.

    मिळालेल्या माहितीनुसार, युवासेना शहर प्रमुख शिवा वझरकर यांच्या हत्येनंतर समर्थकांनी संशयित आरोपीच्या जेसीबी आणि इतर वाहनांची तोडफोड केली. पोलीस विभाग प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने हाय अलर्टवर असतानाच घडलेल्या या घटनेनंतर शहरातील पोलीस बंदोबस्तात मोठी वाढ करण्यात आली आहे. हत्येच्या घटनेनंतर वरीष्ठ पोलीस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. वझरकर याचा मृतदेह जिल्हा सामान्य रुग्णालयातील शव चिकित्सा कक्षात पाठवण्यात आला आहे.

    हत्येप्रकरणी 3 संशयित आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे. हे तिघेही संशयित उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे कार्यकर्ते असल्याची माहिती पुढे आली आहे. स्वप्नील काशीकर, हिमांशू कुमरे आणि चैतन्य आसकर असे अटक करण्यात आलेल्या संशयित आरोपींची नावे असून पोलीस या तिघांची कसून चौकशी करत आहे. सोबतच या हत्येमागील नेमके कारण काय, याचा देखील पोलीस तपास करत आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    मध्यरात्री घरात घुसून ४८ वर्षीय महिलेचा विनयभंग !

    February 23, 2026

    राजकीय वजन वाढवण्याची शिकवण, भावनिक आठवणींचा धगधगता प्रवास ; रोहित पवार !

    February 23, 2026

    रुग्णालयात पाच दिवसाच्या नवजात मुलीला सोडून आई फरार !

    February 23, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.