Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » भरधाव स्कूलबसने चार वर्षाच्या बालकाला चिरडले
    क्राईम

    भरधाव स्कूलबसने चार वर्षाच्या बालकाला चिरडले

    editor deskBy editor deskJanuary 18, 2024No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    छत्रपती संभाजीनगर : वृत्तसंस्था

    राज्यातील अनेक ठिकाणी भीषण अपघाताच्या घटना घडत असतांना नुकतेच छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील बिडकीन येथे एका स्कूल बसने चार वर्षाच्या मुलाला चिरडल्याची धक्कादायक घटना बुधवारी घडली. या घटनेत चिमुकल्याचा जागीच मृत्यू झाला. यावेळी घटनास्थळी जमलेल्या जमावाने संतप्त हाेत स्कूल बस पेटवून दिली.

    पाेलिसांकडून मिळालेल्या माहितीनूसार या घटनेनंतर स्कूल बस चालक हा पळून गेला. या घटनेत हमजा शाहरुख शेख या चिमुकल्याचा मृत्यू झाला. ताे त्याच्या आई समवेत किरणा दुकानात निघाला होता. या दरम्यान सुसाट वेगाने आलेल्या बसने त्याला चिरडले. हे दृष्य पाहून हमजा याची आई भावूक झाली. तिने हंबरडा फाेडला.

    दरम्यान संतप्त जमावने या बसमधील 10 ते 12 विद्यार्थी यांना बसमधून बाहेर उतरवले. त्यानंतर बसला घेराव घालून बसची तोडफोड केली आणि बस पेटवून दिली. या घटनेची माहिती मिळताच बिडकीन पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. फायर ब्रिगेड देखील घटनास्थऴी पाेहचले. पाेलिस घटनेचा अधिक तपास करीत आहेत.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    सर्वांसमोर झालेला अपमान जीवावर बेतला; २० वर्षीय विद्यार्थ्याच्या मृत्यूने जळगाव हळहळले

    February 17, 2026

    अजित पवार विमान दुर्घटना; घातपाताचा संशय, रोहित पवारांची स्वतंत्र चौकशी

    February 16, 2026

    संविधान धोक्यात; टिपू सुलतान मुद्द्यावर भाजपची राजकीय सोय : हर्षवर्धन सपकाळांचा हल्लाबोल

    February 16, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.