

जळगाव : प्रतिनिधी
स्टेशनरीचे साहित्य घेण्यासाठी गेलेल्या संभाजी त्र्यंबक पाटील (वय ६५, रा. खोटे नगर) यांची दुचाकीसह त्याच्या डिक्कीत ठेवलेली ५० हजारांची रोकड आणि कागदपत्रे चोरट्यांनी चोरुन नेले. ही घटना दि. ३० ऑक्टोंबर रोजी दुपारच्या सुमारास बळीराम पेठेतील गोपा स्टेशनरी समोर घडली. याप्रकरणी शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील खोटे नगर परिसरात संभाजी पाटील हे वास्तव्यास असून ते (एमएच १९, ईएम २३३०) क्रमांकाच्या दुचाकीने गावात खरेदीसाठी आले होते. बळीराम पेठेतील गोपाल स्टेशनरी दुकानात खरेदीसाठी गेले असता, त्यांच्या मागावर असलेल चोरट्यांनी दुचाकीच्या डिक्कीत ठेवलेली ५० हजारांच्या रोकडसह कागदपत्रे आणि दुचाकी चोरुन नेली. खरेदीनंतर संभाजी पाटील हे दुचाकी लावलेल्या ठिकाणी आले असता, त्यांना दुचाकी मिळून आली नाही. त्यांनी लागलीच शहर पोलिसात धाव घेत तक्रार दिली. त्यानुसान अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास पोहेकॉ विरेंद्र शिंदे हे करीत आहे.



