Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » बॉयफ्रेंडच्या मदतीने महिलेने केली नवऱ्याची हत्या : युट्यूबवरुन बनविला प्लान
    क्राईम

    बॉयफ्रेंडच्या मदतीने महिलेने केली नवऱ्याची हत्या : युट्यूबवरुन बनविला प्लान

    editor deskBy editor deskJanuary 17, 2024No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    नवी दिल्ली : वृत्तसंस्था

    देशातील अनेक मोठ्या शहरात प्रेम प्रकरणाच्या माध्यमातून अनेक गुन्हेगारी घटना समोर येत असतांना एक धक्कादायक घटना हरियाणातील यमुनानगरमध्ये घडली आहे. एका महिलेने बॉयफ्रेंडच्या मदतीने नवऱ्याची हत्या केली असून पतीला संपवण्यासाठी महिलेने युट्यूबवरुन आयडिया शोधून काढली. पोलिसांनी आरोपी पत्नी आणि तिच्या बॉयफ्रेंडसह तिघांना अटक केली आहे.

    मिळालेल्या माहितीनुसार, पत्नी मीनाक्षी हिची साहिल नावाच्या व्यक्तीसोबत इन्स्टाग्रामवर ओळख झाली होती. या ओळखीचं नंतर प्रेमात रुपांतर झालं. मात्र साहिलच्या प्रेमात पडताना मीनाश्रीला आपलं लग्न झाल्याचा विसर पडला. मात्र साहिलच्या प्रेमात आकंठ बुडालेल्या मीनाक्षी प्रेमासाठी पतीचाच काटा काढण्याचं ठरवलं.

    पतीच्या हत्येसाठी मीनाक्षी यूट्युबवर वेगवेगळ्या आयडिया शोधत होती. महिलेने तिच्या प्रियकरासह पती नीटूविरोधात असा कट रचला की पोलीसही हैराण झाले. इंजेक्शन देऊन रक्तदाब कमी करण्याची घातक कल्पना मीनाक्षीला सुचली. यासाठी महिलेने तिचा प्रियकर आणि त्याच्या आणखी एका साथीदारासह रक्तदाब कमी करणारे इंजेक्शन मागवले. यानंतर पतीला इंजेक्शनचा ओव्हरडोज देण्यात आला. यातून पतीचा मृत्यू झाला. पोलिसांपासून वाचण्यासाठी आणि पतीचा मृत्यू हा खून असल्याचे कळू नये यासाठी मृतदेह शेतात फेकून दिला. नीटूचा मृतदेह ४ जानेवारीला शेतात सापडला होता. पोलिसांनी मृतदेहाचा पंचमाना करताना नीटूच्या हातावर इंजेक्शनच्या खुणा दिसल्या. पोलिसांना आधी ड्रग्जचा ओव्हरडोज घेतला असावा असे वाटले. मात्र नीटूने कोणतेही ड्रग्स घेतले नसल्याचे शवविच्छेदन अहवालात स्पष्ट झालं.

    नीतूचा मृत्यू रक्तदाब कमी करणाऱ्या औषधाच्या ओव्हरडोजमुळे झाल्याचे समोर आलं. त्यानंतर पोलिसांनी नीटूची पत्नी मीनाक्षी हिचे मोबाईल कॉल डिटेल्स चेक केले. त्यामुळे संशय आणखी बळावला. पोलिसांनी तपास केला असता संपूर्ण प्रकरण उघडकीस आले. पोलीस तपासात मीनाक्षी आणि तिच्या बॉयफ्रेंडने आणखी एकाच्या मदतीनी नीटूची हत्या केल्याचं समोर आलं आहे. पोलिसांनी 2 जणांना अटक केली असून अधिक तपास सुरु आहे.

     

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    माजी सरन्यायाधीश भूषण गवईंची बागेश्वर धाम भेट चर्चेत; श्रद्धा विरुद्ध अंधश्रद्धा वादाला पुन्हा उधाण

    April 22, 2026

    मंत्री महाजनांना विचारलं महिलेने जाब : मंत्री महाजनांचे स्पष्टीकरण !

    April 22, 2026

    एसआयटी चौकशीत भोंदूबाबा अशोक खरातची प्रकृती बिघडली; प्रकरणाला नवे वळण

    April 22, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.