Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » एकापाठोपाठ एक ८ सिलिंडरचा स्फोट
    क्राईम

    एकापाठोपाठ एक ८ सिलिंडरचा स्फोट

    editor deskBy editor deskJanuary 15, 2024No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    मुंबई : वृत्तसंस्था

    मुंबईच्या काळचौकी परिसरातून एक भीषण आगीची बातमी समोर आली आहे. या परिसरातील मिंट कॉलनीमध्ये एकापाठोपाठ एक ८ गॅस सिलिंडरच्या स्फोटानंतर ही आग लागल्याची प्राथामिक माहिती आहे. आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अग्निशमन दलाचे बंब घटनास्थळी दाखल झाले आहेत. आगीमुळे परिसरात धुराचे लोट पसरले असून नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे.
    मागील काही दिवसांपासून मुंबईतील अनेक भागात सातत्याने आगीच्या घटना घडत आहेत. त्यातच आज मुंबईतील काळाचौकी परिसरातील मिंट कॉलनी येथे ७ ते ८ घरगुती गँस सिलिंडरचे स्फोट झाल्याने भीषण आग लागली आहे. आगीमुळे परिसरात धुराचे लोट पसरले आहेत.

    नागरिकांमध्ये घबराटीचं वातावरण पसरलं आहे. सर्वत्र आरडाओरड आणि पळापळ सुरू आहे. काळाचौकी परिसर दाटीवाटीचा असल्याने आगीतून बचावासाठी नागरिक घराबाहेर पडण्याचा प्रयत्न करत आहेत. दरम्यान, आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे १० बंब घटनास्थळी दाखल झाले आहेत.

    आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. सुदैवाने या आगीत अद्याप कुठलीही जीवितहानी झाली नसल्याची माहिती आहे. बचावकार्यासाठी महापालिकेचे अधिकारी आणि कर्मचारी देखील घटनास्थळी दाखल झाले आहेत. सिलिंडरचा स्फोट कशामुळे झाला, याचे कारण अद्यापही गुलदस्तात आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    मध्यरात्री घरात घुसून ४८ वर्षीय महिलेचा विनयभंग !

    February 23, 2026

    राजकीय वजन वाढवण्याची शिकवण, भावनिक आठवणींचा धगधगता प्रवास ; रोहित पवार !

    February 23, 2026

    रुग्णालयात पाच दिवसाच्या नवजात मुलीला सोडून आई फरार !

    February 23, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.