Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » जिल्ह्यात वाळूमाफियांचा दादागिरी : थेट प्रांताधिकाऱ्याना जीवे मारण्याचा प्रयत्न
    एरंडोल

    जिल्ह्यात वाळूमाफियांचा दादागिरी : थेट प्रांताधिकाऱ्याना जीवे मारण्याचा प्रयत्न

    editor deskBy editor deskJanuary 13, 2024No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    एरंडोल : प्रतिनिधी

    जळगाव जिल्ह्यातील अनेक ग्रामीण भागासह शहरात वाळू माफियांची मुजोरी दिवसेंदिवस वाढली असून कारवाईसाठी गेलेल्या एरंडोल प्रांताधिकाऱ्याना खाली पाडून त्यांचा गळा दाबून जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना धक्कदायक प्रकार घडला असून याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    पोलिसांच्या माहितीनुसार, एरंडोल तालुक्यातील कासोदा पोलीस ठाणपासून अवघ्या 17 किलोमीटरवरील उत्राण येथील गिरणा नदीपात्रात मध्यरात्रीनंतर साडेबाराच्या सुमारास एरंडोल येथील उपविभागीय अधिकारी मनीषकुमार गायकवाड यांच्या नेतृत्वात उत्राणचे मंडळ अधिकारी प्रमोद मेघश्याम गायधनी, भालगावचे मंडळ अधिकारी दीपक ठोंबरे, तलाठी शेख शकील, निपाणीचे तलाठी विश्‍वंभर शिरसाठ, पोलीसपाटील प्रदीप तिवारी, महाजन आदींचे पथक उतरले. तेथे 8 ते 10 ट्रॅक्टर वाळू भरत असल्याचे दिसून आले. पथकाला पाहताच चालकांनी ट्रॅक्टर भरधाव घेत पलायन केले. मात्र, तेथो दोन ट्रॅक्टर थांबले होते. पथकाने मुसक्या आवळताच आणखी चार-पाच जण आले. त्यांना उपविभागीय अधिकारी गायकवाड, मंडळ अधिकारी गायधनी यांनी सरकारी कामात अडथळा आणू नका, असे बजावत आमचे काम करू द्या, असे सांगताच ट्रॅक्टरचालक आकाश राजेंद्र पाटील, अमोल, राहुल, दादाभाऊ, सागर (पूर्ण नाव, पत्ता माहीत नाही) यांच्यासह 10-12 अज्ञात मारेकर्‍यांनी शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. त्यानंतर पथकातील अधिकार्‍यांना पकडत लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. उपविभागीय अधिकारी गायकवाड यांना जमिनीवर पाडून त्यांचा गळा दाबून जीवे मारण्याचा प्रयत्न केला.
    श्री.गायकवाड यांची प्रमोद गायधनी, दीपक ठोंबरे यांच्यासह कर्मचार्‍यांनी कसेबसे वाळूमाफियांच्या तावडीतून सुटका केली. त्यानंतर संशयितांनी दगडफेक केल्याने गायकवाड, गायधनी, ठोंबरे यांच्यासह कर्मचारी जखमी झाले.

    दगडफेकीत गायकवाड यांचा डोळा थोडक्यात बचावला. गायधनी यांच्या हाताला, कंबरेवर मुका मार लागला आहे. त्यांच्यावर एरंडोल येथील रुग्णालयात उपचार करण्यात आले. या प्रकरणी उत्राणचे मंडळ अधिकारी प्रमोद मेघश्याम गायधनी यांनी कासोदा पोलीस स्थानकात फिर्याद दिली. यानुसार, आकाश राजेंद्र पाटील, अमोल ( पूर्ण नाव माहित नाही ); राहूल ( पूर्ण नाव माहित नाही ); दादाभाऊ ( पूर्ण नाव माहित नाही ) आणि सागर ( पूर्ण नाव माहित नाही ) या सर्वांच्या विरोधात भाग ५, गुरनं ०१/२०२४ भादंवि कलम-३०७, ३५३, ३३२, ३२३, ३७९, १४३, ५०४, ५०६ आणि महाराष्ट्र जमीन महसूल आ. नियम ४८ (७) (८) खाण आणि खनिज अधिनियम २१ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरिक्षक अमोल गुंजाळ हे करीत आहेत. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच चाळीसगावचे सहायक पोलीस अधीक्षक अभयसिंह देशमुख, भडगाव पोलीस ठाण्याचे निरीक्षक तथा कासोदा पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी राजेंद्र पाटील, उपनिरीक्षक अमोल गुंजाळ यांनी भेट देत जखमी अधिकार्‍यांची विचारपूस केली.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    २४२ बक्षिसांची कमाई; राष्ट्रपती सन्मानाने गौरवले संजय शेलार

    January 25, 2026

    उड्डाणपुलाखाली सिमेंट ब्लॉकने दोन तरुणाना मारहाण

    January 25, 2026

    कुंटणखान्यावर छापा; अल्पवयीन मुलीची सुटका, आरोपी अटकेत

    January 25, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.