Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » २४२ बक्षिसांची कमाई; राष्ट्रपती सन्मानाने गौरवले संजय शेलार
    क्राईम

    २४२ बक्षिसांची कमाई; राष्ट्रपती सन्मानाने गौरवले संजय शेलार

    editor deskBy editor deskJanuary 25, 2026No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव : प्रतिनिधी 

    जळगाव जिल्हा पोलीस दलाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला असून रामानंद नगर पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले कर्तव्यदक्ष पोलीस उपनिरीक्षक संजय एकनाथ शेलार यांना २०२६ सालचे प्रतिष्ठित ‘राष्ट्रपती पोलीस पदक’ जाहीर झाले आहे. त्यांच्या ३५ वर्षांच्या प्रदीर्घ, निष्ठावान आणि निष्कलंक सेवेचा हा सन्मान मानला जात आहे.

    पोलीस दलातील शिस्त, प्रामाणिकपणा आणि समर्पणाचे आदर्श उदाहरण म्हणून संजय शेलार यांची ओळख आहे. त्यांनी आपल्या सेवाकाळात तब्बल ३५ वर्षे अखंडपणे कर्तव्य बजावले असून, या कालावधीत उत्कृष्ट कामगिरीबद्दल त्यांना २४२ बक्षिसे मिळाली आहेत. विशेष म्हणजे, संपूर्ण सेवाकाळात त्यांना एकदाही शिक्षा, दंड अथवा ताकीद देण्यात आलेली नाही. त्यांचा सर्व्हिस रेकॉर्ड पूर्णपणे स्वच्छ आणि अनुकरणीय आहे. कर्तव्यनिष्ठेचा आणखी एक विशेष पैलू म्हणजे, ३५ वर्षांच्या सेवेत त्यांनी कधीही आजारपणाची रजा घेतलेली नाही. कामावरील निष्ठा, शिस्तप्रिय जीवनशैली आणि जबाबदारीची जाणीव यातून त्यांचे व्यक्तिमत्त्व अधोरेखित होते.

    या उल्लेखनीय सेवेची दखल घेत भारत सरकारने प्रजासत्ताक दिन २०२६ च्या निमित्ताने त्यांना राष्ट्रपती पोलीस पदकाने सन्मानित करण्याची घोषणा केली आहे. या गौरवामुळे जळगाव जिल्हा पोलीस दलात आनंदाचे वातावरण पसरले असून वरिष्ठ अधिकारी, सहकारी आणि नागरिकांकडून संजय शेलार यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    धारदार शस्त्र घेऊन दहशत माजविणारा अटकेत !

    February 13, 2026

    ऑनलाइन लोन अॅपचा कहर; वैयक्तिक माहितीचा गैरवापर

    February 13, 2026

    दिवसाढवळ्या १३ वर्षीय मुलावर चाकूहल्ल्याने खळबळ !

    February 13, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.