Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » इन्स्टाग्राम रील्ससाठी पत्नीने पतीलाच संपविले !
    क्राईम

    इन्स्टाग्राम रील्ससाठी पत्नीने पतीलाच संपविले !

    editor deskBy editor deskJanuary 8, 2024No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    नवी दिल्ली : वृत्तसंस्था

    जगभरातील कोट्यावधी लोक सोशल मिडीयाच्या अनेक ठिकाणी नेहमीच व्यस्त असतात त्यातील इन्स्टाग्राम हे सर्वाधिक लोकांच्या पसतीस उतरले आहे. पण याच एका कारणाने चक्क एका पत्नीने परिवाराच्या मदतीने पतीचा जीव घेतल्याची माहिती समोर आली आहे. हि घटना रविवारी ७ जानेवारी रोजी बिहारमधील बेगुसराय याठिकाणी घडली आहे.

    आरोपी महिलेला इंस्टाग्राम रील्स बनवण्याची आवड होती. मात्र तिच्या पतीला ही गोष्ट आवडत नव्हती. पतीने विरोध केला आणि तिला रील बनवण्यापासून रोखले. यावरुन महिलेचा राग अनावर झाला आणि तिने नातेवाईकांच्या मदतीने पतीची हत्या केली. महेश्वर कुमार असे मृताचे व्यक्तीचे नाव असून तो कोलकाता येथे मजुरीचा काम करत होता. मात्र काही दिवसांपूर्वीच तो आपल्या गावी नरहान येथे आला होता. कोलकात्याला जाण्यापूर्वी महेश्वर पत्नीला भेटण्यासाठी सासरच्या घरी गेला होता. तेथे पत्नी व सासरच्यांनी त्याची गळा आवळून हत्या केल्याचा आरोप आहे.

    रविवारी रात्री महेश्वरच्या भावाने कोलकाता येथून महेश्वरला फोन केला होता. त्यावेळी फोन अन्य कुणीतरी उचलला तेव्हा ही घटना उघडकीस आली. संशयावरून महेश्वरच्या भावाने वडिलांना फाफौत गावात पाठवले असता महेश्वर मृतावस्थेत आढळून आला. त्यानंतर खोदवंदपूर पोलीस ठाण्याच्या याबाबत माहिती देण्यात आली. घटनेची माहिती मिळताच पोलीस दाखल झाले, त्यांनी मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमार्टमसाठी पाठवला. त्यानंतर महेश्वरच्या नातेवाईकांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी पत्नीला अटक केली.

     

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    ‘धनंजय मुंडे दुसरे खरातच’; करुणा मुंडे यांचा खळबळजनक आरोप, चौकशीची मागणी

    April 15, 2026

    चाकणकर प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक; अदिती तटकरे यांच्यावर थेट सवालांचा भडिमार !

    April 15, 2026

    कासमवाडीत शस्त्रांसह फिरणाऱ्या दोघांना अटक; पोलिसांची धडक कारवाई

    April 15, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.